सातत्याने लॉकाडाउन वाढविणे अन्यायकारकच
दिल्ली (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन, फिजीकल अंतर, मास्कचे निर्बध लादले गेले. जनतेने ते स्विकारले पंरतू टाळेबंदी शिथील होताच जनतेने नियमाचे उल्लंघन केले पण त्यांच्याही सहनशिलतेला मर्यादा आहेत. सातत्याने लॉकडाउन लादून जनतेला वेठीस धरणे अन्यायकारक होईल असे स्पष्टीकरण वैद्यकीय संशोधन विभागाचे डॉ. रमण गंगाखेडकर यानी केले.
कोरोना-कोविड निर्मूलनासाठी नागरीकानी नियम व अटीचे पालन करणे गरजेचे आहे. पंरतू गेली तीन, चार महिणे जनता टाळेबंदीत आहे. कोविड बाधीताची संख्या वाढते आहे. म्हणून लॉकडाउन वाढविणे हा उपाय होवू शकत नाही. त्यासाठी वैद्यकीय उपचारच पर्याय ठरु शकतात त्यामूळे कोरोना-कोविडचा फैलाव रोगनिदान व उपचारातूनच रोखून कोविडमूक्त भारत करावा जनतेला टाळेबंदी लादून वेठीस धरु नये अशी अपेक्षाही डॉ. गंगाखेडकर यानी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.