कोविड निर्मूलनासह जनतेच्या प्रश्‍नाना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्राधान्य द्यावे

कोविड निर्मूलनासह जनतेच्या प्रश्‍नाना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्राधान्य द्यावे



       लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे कार्यक्षम, तत्पर सेवा देणारे अधिकारी म्हणून परिचित आहेत.  ग्रामीण गावभागातील तंट्या बरोबरच सर्वांगीण विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे.  कोरोना कोविड संसर्गामूळे होत असलेल्या घाईगर्दीत आरोग्य सेवा, जनतेला मार्गदर्शन करणे, जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज ठेवून स्वतः जातीने लक्ष देवून कोरोना कोविड मूक्तीची लढाई लढत आहेत.  ग्रामीण भागातील कोरोना विरोधी मंच स्थापन करुन कोविडवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रियाही जी श्रीकांत यांचीच असल्याने लोकामध्ये नेहमीच चर्चा होत असते. 
 जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे कार्यक्षम अधिकारी असल्याने त्याच्याकडे कार्यालयात भेटीसाठी अभ्यागताची गर्दी असते.  तक्रारीचे गुढ काय ते कोण करतो आहे त्यातील दोषी कोण आहेत यासाठी ते विचारपूर्वक कारवाई करीत असतात, पंरतू त्यांच्या सततच्या विभाग प्रमुख, अधिकारी, यांच्या बैठकीत व्यस्त असल्याने त्यासाठी एक, दोन, तास वेळ जातो.  बाहेर  अभ्यागत भेटीसाठी ताटकळत असतात याची जाणीव ठेवून अभ्यागताना ठरावीक वेळ द्यावी अशी अपेक्षाही अभ्यागतातून व्यक्त होताना दिसते आहे. 
        विशेष म्हणजे भेटीसाठी आलेल्या कोणत्याही नागरीकांना ते भेटल्याशिवाय जात नाहीत म्हणून गर्दी असते पंरतू वेळेअभावी अनेकाना परतावे लागते याची दख्खल घेवून जिल्हाधिकारी जी श्रीकात यानी अभ्यागताना निश्‍चित वेळ देवून त्यांची गैरसोय टाळावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या