लातूरात देशीदारुचा सूकाळ, पाण्याचा दुष्काळ

लातूरात देशीदारुचा सूकाळ, पाण्याचा दुष्काळ



        लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः महिण्यातून तीन वेळा नळाला पाणी वेळेवर येत नाही पाणी, पाणी म्हणून लोकाची ओरड असते पण लातूर पोलीसांच्या मेहरबाणीने लातूर शहरात चोवीस तास कोठे ही केंव्हाही अवैद्य मार्गाने देशीदारु सहज उपलब्ध होत असल्याने लातूरात पाण्याचा दुष्काळ तर अवैद्य देशीदारुचा सुकाळ अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.  एकंदरीत लातूर शहरातील कायदा व सुव्यवस्थाच ढासळली की केवळ चिरिमिरीतून अवैद्य देशी दारु विक्रीस मोकाट परवानगी दिली जाते या संदर्भात पोलीस अधिक्षक लक्ष देतील का अशी अपेक्षाही जनतेतून व्यक्त होताना दिसते आहे. 
        लातूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य देशीदारु विक्री केली जाते.  याविषयी दै. लातूर प्रभात मध्ये वृत्तांकन करुनही पोलीसी कारवाई होत नाही मग न्याय व संरक्षण कोणाकडे मागावे अशी लोकभावनाही व्यक्त होताना दिसते आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या