वाळू तस्करी रोखण्यासाठी वाळघाट लिलावाचा प्रस्ताव

वाळू तस्करी रोखण्यासाठी 
वाळघाट लिलावाचा प्रस्ताव



      हिंगोली (दै.लातूर प्रभात प्र.) ः मराठवाड्यात वाळू तस्करी वाढली, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, सह संपूर्ण मराठवाड्यात अवैद्य वाळू उपसा होत होता, शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामूळे आणी स्थानीक लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामूळे वाळू माफीयाचे फावले जात होते.  मराठवाड्यातील अनेक नदीपात्रातून वाळू उपसा होतो आहे.  दंडात्मक कारवाईतून महसूल जमा होत असला तरी गौण खनिजाचा काळा व्यवहार वाढत चालला होता त्यामूळे वाळू घाटाच्या आक्षेपावर चर्चा झाल्यानंतर वाळू घाटाचा लिलाव करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
      परवा लातूर शहराजवळ अवैद्य वाळू उपसा करुन वाळू घेवून जाणारी वहाने पकड्यात आली पंरतू त्या सोळा वहानातील वाळू गायब कशी झाली याचे गौडबंगाल उघडकीस येण्यापूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील वसमत मध्येही अनाधिकृत वाळू वहातूक करणारी वहाने पकडून दंडात्मक कारवाई करुन महसूल कर वसूल करण्यात आला त्यामूळे वाळू तस्कराना पाबंदी येईल की उलट चांगभले होईल अशीच चर्चा होताना दिसते आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या