कोरोनाच्या निमित्ताने मळीसाठी कारखानदाराना मलिदा !

कोरोनाच्या निमित्ताने मळीसाठी कारखानदाराना मलिदा !
      मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडच्या धास्तीमूळे मद्द आणी मद्याकांच्या मागणीत घट झाल्याचे कारण पुढे करुन साखर कारखान्यातील मळीवरची निर्यात बंदी हाटवून राज्यभरातील साखर उद्योजकाना मळी निर्यात करणे व त्यावर देशीदारु निर्मिती करणेसाठी परवानगी देण्याचा निर्णय उध्दव ठाकरे सरकारने घेतल्याने साखर कारखानदाराना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसते आहे. 
      मागील काळात कारखान्यातील मळी विक्रीवर बंदी घालून देशी विदेशी मद्यावर महसूल कर लादला होता पंरतू राज्य सरकार मध्ये शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार भागीदारीत असल्यामूळे साखर कारखानदारीत कॉंग्रेस, रॉका व भाजपाचा मोठा वाटा आहे त्यामूळे सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधीचे चांगभले होणार असल्याची चर्चा राज्यभर होताना दिसते आहे. 
      कोरोनामूळे सॅनिटायझरीगला मागणी वाढल्याने मळीपासून मद्याक निर्मिती करणे त्यातील अलकोहलचा वापर करुन सैनिटायझर्सची निर्मिती करणे हे कारण पूढे करुन साखर कारखानदाराना मलिदा देण्याचा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याने पश्‍चिम महाराष्ट्रात आनंदोत्सव होत असल्याची चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या