जळकोट बसस्थानक निर्मितीकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
जळकोट (दै.लातूर प्रभात प्र.) : लातूर जिल्हा निर्मितीनंतर नवीन तालूके निर्माण झाले, जळकोट, देवणी, शिरुर अनंतपाळ, रेणापूर असे तालूके झाले सर्वच तालूक्यात बसस्थानेक निर्माण झाली पण उदगीर-जळकोट विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीमूळे जळकोट बसस्थानकाचा प्रश्न अडगळीत पडल्याचीच तक्रार होताना दिसते आहे.
उदगीर-जळकोट हा विधानसभा मतदार संघ राखीव आहे. पुर्वी भाजपाचे सुधाकर भालेराव आमदार होते तर आजघडीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय बनसोडे हे आमदार असून ते राज्यमंत्री आहेत तरी ही जळकोट बसस्थानकाचा प्रश्न अडगळीत असून तो कधी न्यायीक प्रश्न सुटेल अशी संतापजनक चर्चा मतदारात होताना दिसते आहे. संजय बनसोडे हे राज्यमंत्री असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार हे ही राष्ट्रवादीचे जेष्ठनेते असूनही जळकोट बसस्थानकाचा प्रस्ताव प्रलंबीत कसा काय अशी उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. राज्य मंत्री संजय बनसोडे यांना दै.लातूर प्रभात प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन घेण्यास टाळाटाळ केली.