संपादकीय...
ताळमेळात घालमेल कशी
कोरोना-कोविड निर्मूलनासाठी देश पातळीवर युध्द सदर्श्य उपाययोजना असल्यागत आहेत. कांही अंशी दगावत असले तरी बर्यापैकी रोगी बरे होवून घरी परतत असताना केंद्र व राज्य सरकार विनाकारण जनतेला वेठीस धरुन कोरोना-कोविड बाधीताची संख्या वाढते आहे. कोविड रोगावर लसीचे संशोधन चालू आहे. लस बाजारात येत आहे, वादे-इरादे जाहिर केले जात आहे. आम जनता टाळेबंदीत अडकून बसली असली तरी सरकारी रोग निर्मूलन बाह्य पाहतच हे सरकार आहे. की भस्मासूरीकृतीचे लोक मृत्यूप्रिय बिनबुडाचे सरकार आहे अशीच चर्चा टाळेबंदीत जगणारे लोक वैतागूण बोलताना दिसत आहेत याबद्दल सरकारी यंत्रणेला जाण-जाणीव नसल्याचेच चित्र दिसते आहे.
सत्ता हाकणारी ही माणसंच आहेत, ती-ही माणसं आहेत पण आपणापेक्षा शहाणी-दीडशहाणी असावीत म्हणूनच मतदारानी त्यांना निवडून दिलेले असते पण शासक-लोकप्रतिनिधी बनल्यानंतर जनतेकडे-मतदाराकडे पाठ फिरवून केवळ सत्ताकारण करण्यातच ते गुंतलेले असतात म्हणूनच त्यांच्या हातून ताळमेळ लागणार्या बाबी ही घाळमेळात अडकून पडतात आणी जनता सरकार मायबाप म्हणून पदर पसरुनच बसत असणे अशीच गत कोरोना-कोविडच्या संसर्ग रोगावरुन सरकारची होणारी घालमेळ ही ताळमेळ नसल्यानेच होते आहे अशीच चर्चा राजकीय वर्तूळात होताना दिसत आहे.
केंद्र सरकार मधील आरोग्य विभाग, आरोग्य मंत्री, औषधी निर्माण संशोधन केंद्र व देशभरातील सरकारमान्य खाजगी औषधी निर्माण संशोधन केंद्रात एकमेकात ताळमेळ नसल्याने कोरोना-कोविड निर्मूलनाची लस निर्मिती होण्यास वेळ लागतो आहे. संशोधनात एकमत नाही वेगवेगळे निदान करुन निर्णय जाहिर केले जातात. त्यामूळे सर्वसामान्य नागरीकात संभ्रम निर्माण होताना दिसतो आहे. याचेकारण यंत्रणात ताळमेळ नसल्यानेच घाळमेळ होताना दिसते आहे. टाळेबंदीत स्थानीक प्रशासन, पोलीस यंत्रणा व वैद्यकीय अधिकार्याना स्वातंत्र्य दिल्याने त्यांची मनमानी होताना दिसते आहे. जिल्हा प्रशासनाचे दररोजचे नियम, बंधन लादणे सुरुच असते. टाळेबंदी पालनासाठी पोलीस यंत्रणेचा दंडूका आणी दंडात्मक कारवाई चालूच असते. त्यात वैद्यकीय अधिकारी रुग्ण एवढे वाढले, इतके मृत झालेत तपासणीत शिल्लक राहीलेल्यांची संख्या जाहीर करुन मोकळे होतात पंरतू कोरोना-कोविड या संसर्ग रोगामूळे घाबरु नका, रुग्ण बरे होत आहेत न सांगता कोविड महामारी रोग आहे, कोविड बाधीत रुग्ण वाढत आहेत, टाळेबंदीचे पालन करा, घरातच पाय खोरुन मरा पंरत बाहेर पडू नका हेच जिल्हा प्रशासनाचे रोजचे काम ठरलेले असल्याने यंत्रणेत, औषधी-उपचाराचा ताळमेळ नसताना केवळ घालमेळ करुन जनतेला कोंडून ठेवल्याने कोरोना-कोविडचे निर्मूलन होईल ही केंद्र व राज्य सरकारची भोळी बाभडी कल्पना असावी अशीच चर्चा होताना दिसते आहे.
आश्वासने, आदेश देवून किंवा विठ्ठल-तुळजाईला साकडे घातल्याने नव्हे तर कोरोना-कोविड रोग हा हमखास औषधी उपचाराशिवाय बरा होऊ शकत नाही तो कमी जास्त प्रमाणात ताप-हाडीतापीप्रमाणे राहाणारच हे वैद्यकीय अधिकार्याना ज्ञात असतानाही ते तसे न सांगता किंवा सरकारला यंत्रणेला जनतेच्या मागे न लागता केवळ औषधी लस निर्मितीकडे लक्ष द्या असे बजावून सांगत नाहीत कारण आरोग्यधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणी आरोग्य मंत्रालय किंवा आरोग्य मंत्री यांच्यात समन्वय ताळमेळ नसल्यानेच घालमेळ होेते आणी रुग्णासह कोंडून बसलेल्याना मृत्यू होतो हेच सूत्र होवून बसल्याची चर्चा सर्वस्तरातून होताना दिसते आहे.
विशेष म्हणजे कोरोना कोविड निर्मूलनाची औषधी लसीच संशोधन पूर्णत्वास आले असून महिना-सहामहिण्यात ती बाजारात येणार असल्याचे सांगण्यात आले तर मुंबईत औषध निर्मितीचे संशोधन करणेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी अशी एक बातमी आणी शरद पवार यानी कान टोचताच नाशीक मधील आरोग्य विद्यापीठात संशोधन सुरु झाल्याची बातमी वाचल्याने लोकामध्ये हे काय चालले आहे अशीच भिती निर्माण झाली असून केंद्र व राज्यभरातील मृत्यूदर घटल्याचे वृतपत्रातून सांगीतले जाते हा सारा प्रकार सरकारी यंत्रणेतच मूळात ताळमेळ नाही हेच स्पष्ट होते अशी आरोग्य विभागाच्या परिसरात होताना दिसते आहे.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी तर अफलातूनच वाणी करतात. वेळोवेळी योग्य निर्णयातून टाळेबंदी लागू करणे, शिथील करणे या न्यायीक कारवाईमूळेच कोरोना कोविड हा संसर्ग रोग नियंत्रणात असून मृत्यूदरही संपूष्टात येतो आहे असे बोलून केंद्र व राज्य सरकारमधील मतभिन्नता कशी व किती आहे हेच स्पष्ट होते त्यामूळे ताळमेळात घालमेळ नको अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
एकंदरीत औषधी लस हाच एक कोरोना-कोविड निर्मूलनावरचा उपाय आहे. लॉकडाउन नाहीच अशी चर्चा सर्वत्र होत असून उद्याला केंद्र व राज्यशासन ताळमेळ लावून घालमेळ न होऊ देता न्यायीक निर्णय घेईल याकडेच जनतेचे लक्ष वेधलेले दिसते आहे एवढेच.