टाळेबंदीचे उल्लंघन करुन कोविड बाधा झाल्याचा कांगावा करणार्या मंत्री-आमदाराचे सदस्यत्व रद्द करावे
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः आमजनतेसह सर्वसामान्य नागरीक, कामगार, मजूर, बारा बलूतेदार कोरोना-कोविड निर्मूलनासाठी काठेकोरपणे टाळेबंदीचे पालन करीत असताना प्रसिध्दीच्या व सहानुभूती मिळविणेच्या हव्यासापोटी नियमाचे उल्लंघन करणार्या मंत्री-आमदाराचे आमदारकीचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी नागरीकातून होत आहे.
कोरोना कोविड निर्मूलनासाठी केंद्र व महाराष्ट्र सरकारने टाळेबंदी, फिजीकल अंतर, मास्क वापराचे निर्बध लागू केले आहेत असे असतानाही मतदार संघात फिरणे, अधिकारी-पत्रकारांच्या बैठका घेणे, विवाह सोहळा, वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होवून टाळेबंदीचे उल्लंघन, फिजिकल अंतराचे बंधन तोडणे, मास्क वापर न करणे, समूहात घुसून फोटो काढणेसाठी मास्क बाजूला फेकून कॅमेर्यासमोर थांबणे असे वर्तन लोकप्रतिनिधीकडूनच होताना दिसते आहे. ते कोरोना-कोविड निर्मूलनाच्या लढाई विरोधातीलच कृती असावी असे स्पष्ट होत असून, महाराष्ट्र मंत्री मंडळातील कोरोनाबाधीत आमदार, मंत्र्यासह लातूर जिल्ह्यातील मंत्री-आमदार तर लोकसंपर्काची नौटंकी करुन केवळ प्रसिध्दीसाठी लोकांच्या सहानुभूतीसाठीच कोरोना-कोविडची लागण झाल्याची ठरवूनच चर्चा करीत असावेत अशी दिशाभूल होणारी कृती असावी अशीच चर्चा होत असल्याने अशा नौटंकी व दिशाभूल करणार्या मंत्री, आमदाराची आमदारकीच रद्द करावी अशी मागणी ही आम जनतेतून होताना दिसते आहे.