लॉकडाऊन काळातील विजबिल, घरपट्टी, नळपट्टी माफ करावी

लॉकडाऊन काळातील विजबिल, घरपट्टी, नळपट्टी माफ करावी 


लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना-कोविड निर्मूलनासाठी लातूर शहरातील सर्व उद्योगधंदे बंद असल्याने कामगार, मजूर, बाराबलूतेदाराना काम धंदे नसल्याने उपासमारीत जगावे लागते आहे उत्पन्नच नाही तर घराचे विजबील, पाणीपट्टी, घरपट्टी, भरणे अवघड असून घरची चूल कशी पेटवावी असा प्रश्‍न भेडसावतो आहे त्यासाठी महावितरणने विज बिल माफ करावे तर लातूर महानगरपालिकेने नळपट्टी, घरपट्टी, माफ करावी अशी मागणी होत असून महिला बचत गट, बँक कर्जाच्या हप्त्यानाही मूद्दत वाढ द्यावी अशी मागणी होताना दिसते आहे. 
 कोरोना कोविड निर्मूलनासाठी संसर्ग रोग होऊ नये यासाठी टाळेबंदी लागू असल्याने मोलमजूरी बंद झाली, कामधंदे नसल्याने चूल बंद पडली त्यात टाळेबंदीची जीवघेणी परिक्षा यातूनच मार्ग काढणे, जगणे कठीण झाले असल्याने महावितरण आणी मनपाने सहानुभूतीपूर्वक विचार करुन लातूरातील गोरगरीब, मागासवर्गीय, कामगार, मजूर, बारा बलूतेदाराचे विजबील, घरपट्टी, नळपट्टी, माफ करावी अशी मागणी होताना दिसेत आहे. 


कोरोना-कोविड संकटकाळी नगरसेवक बेपत्ता 


लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड, संसर्ग रोगाने लातूर शहरात हाहाकार माजविला असताना लातूर महानगर पालिकेतील प्रभागातील कांही नगरसेवक बेपत्ता असल्याने ते कोठे गेलेच यांचा तपास घ्यावा अशी चर्चा प्रभाग मधील मतदार-नागरीकासह सर्वत्र होताना दिसते आहे. 
कोरोना-कोविड या महामारी रोगाने जनतेला ग्रासले असून टाळेबंदीत उपासमार होऊ नये यासाठी स्वस्त धान्य दुकाना मार्फत मोफत धान्य वाटप केले जाते आहे ते गरजूना मिळते आहे की नाही, स्वस्त धान्य दुकाने चालू असतात का ? अशी चौकशी करणे प्रभागातील नागरीकांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेणे, नगरसेवकाचे काम असते पण कोरोना-कोविड संकटकाळात नगरसेवक बेपत्ता कसे कोठे गेले अशीच चिंताजनक चर्चा होताना दिसते आहे.


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या