पत्रकार सोमवंशी मृत्यू प्रकरणी
खाजगी दवाखान्याचे डॉक्टरवर कारवाई करावी
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर येथील जेष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचा कोरोना-कोविड बाधेमूळे मृत्यू झाला प्रारंभी २८ जुलै रेाजी त्याना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले, वीस हजार रु अनामत घेवून पून्हा पंचाहत्तर हजार रुपयाची मागणी व रोजचा पाच हजार रुपये असा खर्च सांगीतल्याने दोन दिवसानंतर सोमवंशी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याना इतर व्याधी असल्यातरी कोविड उपचारात खाजगी डॉक्टरने केवळ पैसे उकळण्यासाठीच सोमवंशी याना दवाखान्यात ठेवल्याने कोविड रोग शरीरात भिनला आणी त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने सदरील दवाखाना व डॉक्टराचा परवाना-पदवी रद्द करुन संबंधीत डॉक्टरवर कारवाई करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी सामाजीक चळवळीतील कार्यकर्त्यातून होताना दिसते आहे.
कोरोना कोविड निर्मूलनासाठी शासनाने खाजगी दवाखान्यात उपचार करणे व उपचारार्थ ठराविक शुल्क ठरविलेली असताना सदरील डॉक्टरने अशी अनामत व जास्तीच रक्कम मागणी करुन कोविडग्रस्त सोमवंशी याना हतबल केल्याने सरकारी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याने यास खाजगी डॉक्टरच कारणीभूत असल्याने पत्रकार गंगाधर सोमवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी खाजगी डॉक्टरास दोषी ठरवून त्याच्या दवाखान्याचा परवाना रद्द करावा, तसेच डॉक्टरची पदवी रद्द करुन त्याना जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरताना दिसते आहे.