पून्हा टाळेबंदी आली दारा, मरणाने तिचे स्वागत करा !

पून्हा टाळेबंदी आली दारा, मरणाने तिचे स्वागत करा !



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लोकशाही राज्यात कोणी-कोणाला आडवू शकत नाही.  प्रत्येकाना जगण्याचा अधिकार आहे तसा मरण स्विकारण्याचाही असावाच लागतो.  कोरोना-कोविड निर्मूलनासाठी जीवापाड लढाई केली पाहिजे.  कोविड हद्दपार, झाल्याशिवाय लढाई थांबली नाही पाहिजे औषधी लस हाती येईपर्यंत जिंकू अथवा मरु या उद्देशानेच टाळेबंदी, फिजीकल अंतर व मास्क वापराचे कठोर निर्णय पाळणे हे आद्दकर्तव्य ठरते यासाठी सरकारी बाबूजीचे आदेश व नियमाचे काटेकोर पालन करु या पून्हा टाळेबंदी आली दारा, मरणाने तिचे स्वागत करा असे आवाहन गोर-गरीब, कामगार, मजूर, बाराबलूतेदारी करणार्‍या महिला पुरुषानी व्यापारी, उद्योजक, लोकप्रतिनिधी आणी धनदांड्या भांडवलदाराना केले आहे.  
 त्यांच्याकडे आहे ते टाळेबंदीत कितीही दिवस आणी घरातले संपून जाईल (जातच नाही)असे जगतील निर्बध पाळतील पण ज्यांच्याकडे चूल पेटण्यासाठीही कांही नाही दोन घास पोटात ढकलणे दुरच राहिले तरी ही लोकशाही भारताचे नागरीक असल्याने हर्षमूखाने, व्याकूळ शरीराने स्वाभिमानाने सरकारी आदेश, शासनाचे नियम, स्थानीक प्रशासनाचे नियम व अटी स्विकारुन टाळेबंदीचे उल्लंघन न करता कठोर अमलता आणू म्हणून आम्ही गोरगरीब, कामगार, मजूर, बाराबलूतेदार पून्हा टाळेबंदी आली दारा, मरणाने तिचे स्वागत करा असे आवाहन करीत आहेत असे खाजगीत दै. लातूर प्रभातच्या प्रतिनिधीस बोलताना केले. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या