आंधळं दळतं, कुत्र पिठ खातं अशी अवस्था असल्याने कमविण्याच्या नादात जीव गमावून काय मिळणार

आंधळं दळतं, कुत्र पिठ खातं अशी अवस्था असल्याने कमविण्याच्या नादात जीव गमावून काय मिळणार-ऍड. बळवंत जाधव यांचे स्पष्ट मत



प्रशासन, लोकप्रतिनिधी आणी जनतेत समन्वय नसल्याने आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं अशीच आजची अवस्था झाली असल्याने कोरोना कोविड संसर्गात कमविण्यासाठी जीव गमावून काय मिळणार आहे असे स्पष्ट मत सामाजीक, राजकीय, वकीली व्यवसायातील मूरब्बी ऍड. बळवंत जाधव यानी दै. लातूर प्रभात प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. 
 राज्यभरात अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी शहरी-ग्रामीण भागात जाऊन कोरोना-कोविड रुग्णाची पाहणी करुन विचारपूस करतात.  वैद्यकीय अधिकार्‍याना सुचना देवून सहकार्य करतात त्याप्रमाणे लातूरचे पालकमंत्री ना. अमित देशमूख यानी स्वतःच लॉकडाउन करवून घेवून जनतेला दुरचित्र संवादातून मार्गदर्शन करतात.  टाळेबंदी लागू करण्यापूर्वी जशी जिल्हाभरातील लोकप्रतिनिधीची बैठक घेवून त्यांचे मत जाणून घेतले तसेच सामाजीक, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, वकील, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी संघ, हमालमापाडी संघटना, सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते, शैक्षणीक संस्थाचालक, पत्रकार, साहित्यीक, कृषी तज्ञ, सर्वच क्षेत्रातील अधिकारी यांची बैठक् घेवून त्यांचे मत आजमावले का ?  असे कांहीच न करता टाळेबंदीचा निर्णय घेतला गेला तो जिल्हाधिकारी जी श्रीकांत यानी जारी केला.  टाळेबंदीपूर्वी किमान लातूर शहर मतदार संघातील नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, शहरी भागात जावून पाहणी करुन त्यांच्या समस्या जाणून न घेतल्याने सर्वकष प्रशासन यंत्रणा व नागरीकात समन्वयच नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मत ऍड. बळवंत जाधव यानी व्यक्त केले. 
 कोरोना-कोविड निर्मूलनासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रामाणीकपणे कार्यरत आहेत.  मंत्रीमंडळातील सदस्य, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकार्‍याशी संपर्क ठेवून आहेत.  पंरतू राज्यातील अपवादात्मक मंत्री, लोकप्रतिनिधी-स्थानीक प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्यानेच कोरोना-कोविड ग्रस्ताची संख्या वाढताना दिसते आहे.  टाळेबंदी शिवाय परिस्थिती आटोक्यात येवू शकत नाही ही मुख्यमंत्री टाकरे यांची भुमिका योग्य असून मी सहमत आहे.  पंरतू अंतिम वर्षाची पदवी परिक्षा न घेताच परिक्षार्थीना उतिर्ण करणे हा निर्णय चूकीचा असल्याचे ऍड. बळवंत जाधव म्हणाले. 
 शेतकर्‍याच्या संदर्भात बोलताना ऍड. बळवंत जाधव म्हणाले की, कर्ममाफी, पिकविमा हे निर्णय मुख्यमंत्री स्तरावर योग्य आहेत पण स्थानीक पातळीवर योग्य अमलबजावणी होणे आवश्यक आहे.  शेतात कापूस पिकलाय पण कुत्रा नागडाच आहे स्पष्ट केले ते कापूस असला तरी कापसाला भाव नाही म्हणून शेतकरी उपासी आहे असे म्हणायचे आहे की सत्ता शिवसेनेची असली तरी शिवसैनिकच नागडा-उपाशी आहेत असे म्हणायचे आहे हे मात्र ऍड. बळवंत जाधव यानी कळू दिले नाही, हे विशेष वाटते. 
 टाळेबंदी व कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलताना ऍड. बळवंत जाधव म्हणाले की, टाळेबंदी लागू करायचीच आहे तर दोन दिवस अगोदरच दारु दुकाने बंद करणे म्हणजे दारु दुकानदाराना दारु साठा करणेसाठी जागृत करुन सवलत देणे असेच असावे त्यातून अवैद्य दारु विक्री होणारच, भ्रष्टाचाराला वाव मिळणार असल्याने चिरिमिरीचा वास येतो असे स्पष्ट करुन जनता संचारबंदी योग्यच आहे पण जनतेला न्यायीक रक्षणासह त्यांच्या गरजापूर्तीसाठीही प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या