मोफत धान्य वाटपालाही कूलूप!

टाळेबंदी उठताच स्वस्त धान्य दुकानातून, मोफत धान्य वाटपालाही कूलूप 



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड निर्मूलनासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केले होते.  ती टाळेबंदी उठविण्याने सर्व व्यवहार सूरळीत होत  असतानाच गोरगरीब, कामगार, मजूर, व गरजू व्यक्तीचे कामधंदा नसल्याने आणी जनजीवन सुरळीत होईपर्यंत उपासमारी होऊ नये यासाठी गरजूना मोफत धान्य वाटपाची माहिती स्थानीक प्रशासनाद्वारे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत राबविली जात होती पंरतू टाळेबंदी उठताच स्थानीक स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप मोहीम थंडावल्याची तक्रार गरजू नागरीकातून होताना दिसते आहे. 
टाळेबंदी काळात शिधापत्रीका धारकाना कमी, जास्त प्रमाणात मोफत धान्य वितरीत होत होते.  कांही दुकानातून गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी होत्या पण आजघडीला टाळेबंदी उठली आणी मोफत धान्य वाटप मोहीमच बंद झाली की काय अशीच चर्चा गरजू व्यक्तीत होत असून महिणा संपत आला तरी धान्य वाटपाचा अंदाज नसल्याने आणी स्वस्त धान्य दुकानाला कुलूप असल्याने त्या त्या परिसरातील नागरीकात चिंतात्मक चर्चा होताना दिसते  याकडे जिल्हा प्रशासन, महसूल विभाग लक्ष देईल काय अशी मागणी होताना दिसते आहे.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या