सामान्यांच्या समस्या सोडविण्यात आमदार-मंत्री उदासीन
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः टाळेबंदी उठली असली तरी कल्याणकारी योजना राबविण्याऐवजी मंत्रीगण हे आपापल्या मर्जीतील अधिकार्याच्या बदली, बढतीतच गुंतले असल्याने मंत्रालय स्तरावरील विकासात्मक कामे होत नसल्याने आमदाराना नागरीकाच्या तोंडघशी पडावे लागते आहे त्यात मंत्रीच आपापल्या खात्यातील अधिकार्याशी कोणते कामाला प्राधान्य द्यावे मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी काय उपाय-योजना आखाव्यात याचीच चाचपणी करीत असून अतिपावसामूळे पिकाचे नुकसान, मजूरांना रेाजगार उपलब्ध करुन देणे बाबत मंत्री व आमदार उदासीन असल्याचे चित्र दिसते आहे. टाळेबंदीत कामधंदे बंद असल्याने मजूरी मिळत नव्हती, पंरतू टाळेबंदी उठल्यानंतर ही कामच नसल्याने कामगार, मजूरांची उपासमार होत असून पावसामूळे पीक हातचे गेल्याने अल्पभुधारक चिंताग्रस्त असले तरी स्थानीक आमदार, जिल्हा प्रशासन आणी मंत्री ही सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी उदासीन असल्याने नागरीकात नाराजी पसरल्याचे दिसते आहे.