झरोका
एक - समाजकारण, राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण हे सर्वकांही ऑनलाईन झाल्यामूळे घरबसल्या खेळी करता येत आहेत. कोरोना-कोविडमूळे ऑनलाईन शिक्षण पध्दती आल्यामूळे शासन, प्रशासनही ऑनलाईन होवून बसल्याने सर्वकांही यत्रमानवाप्रमाणे सुरळीत चालू आहे. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी याना धन्यवाद दिले पाहिजेत.
दुसरा - कांहीतरीच बोलता, ऑनलाईन शिक्षणामूळे मुलं लागलीच होमवर्क करुन खेळायला जात आहेत तर परवा गणेश उत्सवा निमित्ताने गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापणा करुन ऑनलाईन मोदक गणपती समोर ठेवल्याने प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे धार्मीकवादाच्या भोवर्यात अडकले आहेत त्यातच तूम्ही सर्वकांही व्यवस्तीत होत आहे म्हणता म्हणजे देशाची संस्कृती, संविधानच बाजूला सारता की काय अशीच शंका येते आहे. ऑनलाईन, ऑफलाईन असे कांही बोलू नका लोकशाही आहे समजलं का
एक - अरे गैरसमज करु नकोस, विनासायस सर्व कांही होते आहे म्हणून बोलतो आहे. बघ, कॉंग्रेस नेतृत्वाबद्दल जूने, नवे कार्यकर्ते शंका-कूशंका निर्माण करीत असल्याने सोनिया गांधी यानी तात्काळ ऑनलाईन बैठक बोलावली आहे मग राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न एक बटन दाबताच सर्वजन समोर येवून घरातूनच आपापले मत व्यक्त करतात ही सोपी पध्दत आहे. म्हणून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी याना धन्यवाद देवू म्हणतोय.
दुसरा - गेली सहावर्ष पाहतो आहे. सर्वसामान्य जनता ओरडते आहे. सर्वांगीण विकास खूंटला आहे. दलितावरील अन्याय अत्याचार वाढले आहेत. बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढले आहेत. सर्वकाही वटहूकूम जारी करुन प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे देशाला कंगाल करीत आहेत आणी सारंकांही सोपं होतय म्हणता ही देशघातकी कृती आहे.
एक - देशघातकी कृती असे कसे म्हणता, भारत महासत्ताक देश बनविण्यासाठी प्रधान मंत्री धडपड करीत आहेत आणी तूम्ही म्हणजे सरकारविरोधी भुमिका घेता हे बरोबर नाही.
दुसरा - महासत्ताक भारत कसा बनणार आहे. देशातील उद्योग-व्यवसाय, रेल्वे, विमानसेवा, खाजगीकरण केल्याने की देशाची जमीन परदेशी उद्योजक, व्यवसायीकाना दिल्याने होणार आहे की देशाची अर्थव्यवस्था कंगाल करुन परदेशी गुंतवणूकदाराच्या हाती देशाचा कारभार दिल्याने होणार आहे. देशातील विविध जाती, धर्माच्या लोकाना हिंदू धर्माची सक्ती करुन पून्हा मनूसंस्कृती लादल्याने भारत महासत्ताक होणार आहे हे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानीच जाहिर करावे म्हणजे झाले. ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे ना मग तसा खूलासा करावाच ही लोकभावना आहे.