भाडेतत्वारील सर्वच जागा ताब्यात घ्याव्यात !

मनपाने यशवंत ताब्यात घेतली, भाडेतत्वारील सर्वच जागा ताब्यात घ्याव्यात !



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर महानगर पालीकेने कधी नव्हे ते धाडसी निर्णय घेवून साळे गल्लीतील यशवंत शाळेची जागात ताब्यात घेतली त्याच आधारावर इतर संस्थाना, उद्योजकाना भाडे तत्वावर ताब्यात दिलेल्या जागासह अतिक्रणीत जागा ही ताब्यात घेवून शहरी विकासाला प्राधान्य द्यावे अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होताना दिसते आहे. लातूर शहरातील लातूर महानगरपालिकेच्या जागा, ग्रीन बेल्ट, भुखंड अनेकानी ताबा घेतल्यामूळे त्याचा विनीयोग नाही अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.  अनेक भुखंड, जागा, ग्रीन बेल्ट हे राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामूळे इतरांच्या ताब्यात आहेत पंरतू लातूर महानगरपालीका प्रशासनाचे आयूक्त देविदास टेकाळे महापौर विक्रांत गोजमगुंडे यानी राजकीय वरदहस्ताला शह देण्यासाठीचे हे पाऊल उचलले असावे अशीच चर्चा होत असून याच पध्दतीने धनदांडग्या, उद्योजक, व्यवसायीकाकडे आणी राज्यकर्त्याकडे असलेली थकबाकी वसूल करावी असेही मागणी जोर धरीत असताना दिसते आहे. त्यावर मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन काय भुमिका घेणार आहे अशी ही संशायात्मक चर्चा होताना दिसते आहे. 
अनेक संस्थाचालकानी मनपाच्या जागेवर अतिक्रमन केले असून ग्रीन बेल्टवर अंगणवाडी, बालवाडी, इंग्लिश स्कूल, मंदीरे उभी केली आहेत तीही अतिक्रमने उठवून लातूर महानगरपालीकेने नागरी विकास व सुविधासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरीकातून होताना दिसते आहे.  विशेष म्हणजे लातूर नगर परिषद अस्तित्वात असल्यापासून अनेक शिक्षण संस्था, सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्थाना नपा, मनपा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने खैरात केली आहे त्याचीही न्यायीक चौकशी करावी अशी मागणीही लातूरातील जाणकार नागरीकातून व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या