हाक दिली तिथं पोलीस हजरच पण त्यांच्या वसाहतीचे काय ?

हाक दिली तिथं पोलीस हजरच पण त्यांच्या वसाहतीचे काय ?



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः शांतता भंग झाली, चोरी चपाटी झाली पोलीसच कारणीभूत असतात असा नागरीकांचा हेका असतो.  सण,वार कांहीच बाजूला ठेवून मंत्री, संत्री, यांच्या दौर्‍यात पोलीसच तैनात, दंगा, धोपा, मोर्चा, आपत्ती काळात पोलीसच हवे असतात पण त्याच पोलीसांच्या सुख, दुःखात कोणीही सहभागी होत नाही उलट कामात, वेळेत कसूर म्हणून कारवाई केली जाते पण त्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे काय, त्यांची वसाहत आहे त्या ठिकाणी घर मिळते काय ते कोठे राहातात याचा कोणी विचार करीत नाही, तरी ही अपवादात्मक पोलीस सोडले तर सर्वच पोलीस कर्मचार्‍याना वसाहतीविना नागरी सेवा बजावावी लागते आहे, त्याकडे कोणी लक्ष देईल काय अशी विचारणा दबक्या आवाजात पोलीस कर्मचारी करीत असताना दिसतात. 
पोलीस अधिकार्‍याच्या मर्जीतील पोलीस कर्मचार्‍याना पोलीस वसाहतीत शासकीय घर मिळते पण प्रामाणीक सेवा बजावणार्‍याना घर मिळत नाही अशी वास्तवता असून अनेक पोलीस कर्मचारी वसाहतीविना अन्यायग्रस्त असल्याने पोलीस कल्याण समिती किंवा पोलीस अधिक्षक कार्यालयीन समितीही पोलीसांच्या वसाहतीकडे दुर्लक्ष करीत असून लातूर येथील नियोजीत पोलीस वसाहतीचा प्रश्‍न अद्याप ऐरणीवर असल्याने वरिष्ठ अधिकारी, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांचेकडे पत्रकार बंधू पोलीसांचे ग्रार्‍हाने मांडतील काय अशीच अपेक्षा पोलीसाकडून व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या