पत्रकार हे स्वातंत्र्यदिनाच्या दुसर्‍या दिवसी काळे वस्त्र परिधान करुन आंदोलन छेडतात तेंव्हा...

पत्रकार हे स्वातंत्र्यदिनाच्या दुसर्‍या दिवसी काळे 
वस्त्र परिधान करुन आंदोलन छेडतात तेंव्हा



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः स्वतंत्र भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा होतोय आणी ७४ व्या वर्षात भारत पदार्पण करीत असतानाच लातूर येथील संपादक बनसोडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे वृतांकन करणेसाठी लातूर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पूतळ्याजवळ हजर असताना बंदोबस्तात असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे हे पत्रकार बनसोडे याना अवमानास्पद वागणूक देतात.  अपशब्द वापरतात, मारण्यासाठी हात उगारतात, काय मग व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणी लोकशाहीच्या चौथ्या खांबालाच वेसन घातली.  पत्रकारीतेच्या अवमान केला म्हणून पत्रकार बनसोडे हे पंधरा आँगस्ट हा स्वातंत्र्यदिन साजरा करुन १६ ऑगस्ट रोजी काळे वस्त्र परिधान करुन पत्रकारीता आणी मानवी हक्क गेले कोठे म्हणून निषेध व्यक्त करीत असतील तर ही लोकशाही की हुकूमशाही असाच प्रश्‍न सर्व सामान्यासमोर उभा असल्याचे चित्र दिसते आहे. 
 पत्रकार हा समाजाच्या आरसा आहे. समग्र बदलाची चाहूल देणारी पत्रकारीता असते याच पत्रकारितेला एक सचिन सांगळे नावाचा पोलीस अधिकारी चाप देणार असेल तर दुसरे दुर्देव्य कोणतेही नसावे अशीच चर्चा होत असून लातूर शहर, जिल्हाच काय महाराष्ट्रातील पत्रकार पक्ष, संघटनाचे नेते झाल्याप्रकाराची निंदा करुन लातूरचे उपविभागीय पेालीस अधिकारी सचिन सांगळे यांना निलंबीत करण्याची मागणी करीत आहेत.  यावर शासन काय भुमिका घेणार आहे याकडे सर्वाचे लक्ष लागून राहील्याचे दिसते आहे. 


 


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या