नकारात्मक कोविड रुग्ण सकारात्मक करणारा वैद्यकीय अधिकारी कोण?

नकारात्मक कोविड रुग्ण सकारात्मक करणारा वैद्यकीय अधिकारी कोण ?



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड या महामारी रोगाचा फैलाव होत असल्याने लातूर शहर व जिल्ह्यात कोरोना-कोविड निर्मूलनासाठी कठोर लॉकडाऊन लादण्यात आले आणी तातडीने तपासणी व्हावी त्यातून टाळेबंदी शिथील करता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिजन चाचणी करण्यासाठी तशी चाचणी केंद्राची सुविधा करुन चाचणीसाठी नागरीकांना आव्हान करण्यात आले. 


जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तमाम नागरीकानी चाचणीसाठी रांगा लावल्या पंरतू पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन मधील प्रतिजन चाचणी केंद्रात तपासात एक रुग्ण नकारात्मक आढळला पंरतू तोच रुग्ण पुन्हा सकारात्मक सिध्द करुन त्यास विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले पंरतू सदरील रुग्णाची तपासणी करणारा वैद्यकीय अधिकारी तज्ञ आहे की शिकाऊ आहे कारोना कोविड संशयीत रुग्णाची तपासणीत असेच गैरप्रकार घडतात काय यास जबाबदार कोण आहे.  संबंधीत वैद्यकीय अधिकार्‍यावर काय कारवाई केली जाणार आहे.  
रस्त्यावर का आलास म्हणून त्यास पोलीस चोप देतात.  दंडात्मक कारवाई करतात मग निगेटीव्ह रुग्णास पॉझीटीव्ह करणे व पून्हा निगेटीव्ह म्हणून त्यास विलगीकरण कक्षात ठेवणे हा सावळा गोंधळ कसा काय होतो आहे तसेच रोजच्या रुग्ण वाढीस अकार्यक्षम वैद्यकीय अधिकारीच जबाबदार असावेत अशीच उलटसूलट चर्चा नागरीकात होत असून संबधीत वैद्यकीय अधिकार्‍यावर जिल्हाधिकारी जी श्रीकंत हे काय कारवाई करतील याकडे आमजनतेचे लक्ष लागल्याचे दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या