मराठा आंदोलकांकडून अशोक चव्हाण यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

      भोकर / सिद्धार्थ जाधव / लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना अडविण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. सोमवारी रात्री भोकर तालुक्यातील रेणापूर येथील सभा आटोपून अशोकराव चव्हाण  रात्री आठ वाजेच्या सुमारास भोकरकडे येत असताना भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश कापसे यांच्या बटाळा गावात गाडयांचा ताफा येताच गावातील मराठा आंदोलक मोठ्या संख्येने गोळा झाले होते. चव्हाणांचा ताफा अडविण्याचा ते प्रयत्न करणार होते. परंतु पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावर येण्यापूर्वीच  ताफा अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले परंतु  कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा, चलेजाव च्या घोषणा दिल्या.      पोलीसांना तगडा बंदोबस्त तैनात केला होता या बंदोबस्तामुळे बटाळा गावाला छावणीचे रूप आले होते. मराठा आरक्षणाच्या विषयावरून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेत्यांच्या सभांना जायचे नाही, कुणाचा प्रचारही करायचा नाही, अशी भूमिका मराठा समाजबांधवांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय नेते प्रचाराला आल्यानंतर त्यांना विरोधाचा सामना करावा लागत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोंढा गावात अशोकराव चव्हाण यांचे वाहन फोडण्याचा प्रयत्न झाला होता.यावेळी अनेकांनावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ किंवा या घटनेचा पडसाद म्हणून की काय त्यानंतर अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांकडून नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येतांना दिसुन येत आहे

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या