*वाहनासह 12 लाख 54 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 01 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*

       
      लातूर  (पोअका) : पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात  01 मे 2025 पासून अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी    *"अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान-1"* संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. 
           अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 13/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी औसा येथील एक इसम प्रतिबंधित गुटखा कार मध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 13/05/2025 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास औसा येथील हाश्मी नगर परिसरात छापा मारून  महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 02 लाख 54 हजार 705 रुपयांचा गुटखा व एक क्रेटा कार  असा एकूण 12 लाख 54 हजार 705 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
       प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामे 1) आसिफ महबूब सय्यद, वय 38 वर्ष, राहणार हाश्मी नगर, औसा. जिल्हा लातूर.
 याचे विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार संजय कांबळे,अर्जुन राजपूत,  रियाज सौदागर, दीनानाथ देवकते, राहुल कांबळे, नितीन कठारे, यांनी केली आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*विनापरवाना ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट,पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इत्यादीच्या उड्डानावर बंदी. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेश निर्गमित.*

       लातूर (पोअका) : सद्याच्या भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थीतीमध्ये दहशतवादी/राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक...

लोकप्रिय बातम्या