*विनापरवाना ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट,पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इत्यादीच्या उड्डानावर बंदी. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेश निर्गमित.*

       लातूर (पोअका) : सद्याच्या भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थीतीमध्ये दहशतवादी/राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट. पॅराग्लायडरचा वापर करून त्यांच्या हल्ल्यांमध्ये आणि त्याद्वारे व्हीव्हीआयपींना व लातूर जिल्ह्यातील मर्मस्थळांना लक्ष्य करू शकतात, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन घोक्यात आणू शकतात. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करू शकतात आणि लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात. त्यामुळे ड्रोन रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट, पॅराग्लाडरव्दारे संभाव्य घातपात रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आणि सक्रीय उपाययोजना करणे आवश्यक असल्याने सोमय मुंडे पोलीस अधीक्षक, लातूर तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कलम १६३ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. २०२३ अन्वये ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट. पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इत्यादी च्या उड्डाण क्रियांना लातूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात दिनांक १७/०५/२०२५ ते दिनांक १५/०६/२०२५ पर्यंत पुढील ३० दिवसांसाठी प्रतिबंध करण्याचे आदेश लातूर पोलीसांकडून देण्यात आलेले आहे. यामध्ये हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील. सदरचा आदेश दि. १७/०५/२०२५ रोजी ००.०१ पासून दिनांक १५/०६/२०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत लागू असून या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये दंडनीय असणार आहे.
       सर्व संबंधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावली जाऊ शकत नसल्यामुळे, याद्वारे एकतर्फी आदेश पारित करण्यात आले असून सदरचा आदेश लोकांच्या माहितीसाठी प्रसार माध्यमाद्वारे आणि सर्व पोलीस ठाणे, येथे नोटिस बोर्डवर प्रती चिकटवून प्रकाशित केला जाणार आहे.  सर्व संबंधितांनी नमूद आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*विनापरवाना ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट,पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इत्यादीच्या उड्डानावर बंदी. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेश निर्गमित.*

       लातूर (पोअका) : सद्याच्या भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थीतीमध्ये दहशतवादी/राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक...

लोकप्रिय बातम्या