संपादकीय...
गर्दीतली दर्दी पोरकी...
आठवडी सुट्टी नंतर ही बाजारात लोकांची गर्दी होतच असते. आजघडीला तर कोरोना कोविडची लागण विषारी महाकाय कोविड जंतूचे निर्मूलन करणेसाठी जनतेच्या सहकार्यातूनच जनतेवर लादलेले लॉकडाउन आणि सामाजीक अंतराचे बंधन हे लादून नाकापरीस मोती जड अशीच अवस्था झाली. कारण मर्मावरच उपचार न करता विनाकारण जनतेला वेठीस धरुन टाळेबंदीच्या काळापासून आजपर्यंत जनता आणि शासन प्रशासन यांतील दरी ही कोविडच्या संसर्गजन्य रोगाची जंतू आणि वैद्यकीय उपचारातील आयुद यातील जी तफावत आहे, तेवढीच भयावह असावी असे स्वतः आत्मपरिक्षण केल्यास कोणाही नागरीकांना सत्तेकाय ते पटेल.
कोरोना कोविड हा विषारी जिवघेणा रोग आहे. तो माणसालाच काय कुत्र्या मांजराना किंवा हिंस्र प्राण्यानाही होवू नये पंरतू तो मानवी शरीरात फैलावतो आहे. मोजपट्टीच्या बाहेरची कोरोना कोविडग्रस्त बाधीतांची संख्या आहे. तीवर वेळीच उपचार होत असले तरी लगेच कोरोना कोविड हद्दपार होईल असे म्हणता येणार नाही. मौसमात आंबा पिकाला तो उतरवून घेतला. पण नजर चुकीने एखादा राहिला तर तो पावसाळ्यात आंबाच्या झाडाखालीच उगवतो. अशातलीच कोणत्याही रोगाची बाब असते. म्हणून मौसमातली गर्दी आणि रोजच्या व्यवहारातील गर्दी यातच टाळेंबदीतली गर्दी यात फरक असतो. तो फरक समजूनच कर्त्या धर्त्याने योग्य पाउले उचलली पाहिजेत ही रास्त भावना कोणी ही नाकारु शकत नाही. पण योग्य अयोग्य या बद्दल विचार करण्यास कोणाकडे वेळ आहे, सारे कांही आदेश व अटीवर विसंबून असल्याचे चित्र असल्यानेच कोरोना कोविडची लागन स्थिर असली तरी चिंताजनकच आहे, असे म्हणावे लागेल.
कोरोना कोविड निर्मूलन व फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी लादून जवळपास दोन महिने होत आहेत. परिस्थिती वरचेवर गंभीर होत चाली असल्याने प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन शिथील करुन शक्य असेल तरच टाळेबंदी शिथील किंवा कठोर करावी यासाठीचे अधिकार त्या त्या राज्याना दिले आहेत. पंरतू नविन कांही निर्णय न घेताच टाळेबंदीचे घोडे दामटले जाते आहे. यातून अनुभव किंवा निर्णयाची उनीव लक्षात येते. टाळेबंदी करणे पुर्वीच पूर्वनियोजन करुन जनतेला सावध करुन स्थानीक प्रशासन पोलीस यंत्रणा व लोकप्रतिनिधीशी चर्चा करुन लॉकडाउनचे निर्बंध लागू केले असते तर आजची कठीण परिस्थिती निर्माण झाली नसती. हे कोणी ही नाकारु शकत नाही.
टाळेबंदी शिथील झाली बाजाराला वेळ घालून दिली. पण गर्दी होतेच आहे. टाळेबंदी काळात घरदार जवळ करणेसाठी गर्दी झाली. गावाकडे जाण्यासाठीचे नियम अटी पूर्ण होत नाहीत, पण गांव जवळ केले पाहिजे, म्हणून आपघातात जिव गमवावा लागतो. रेल्वे रुळाखाली चिरडून जिव जातो. रेल्वे चालू झाल्याची अफवा पसरते, आणि वांद्रे मुंबई येथे रेल्वे स्थानकावर गर्दी होते, या गर्दीतली दर्द दुःख काय असावे हे लक्षात घेणे म्हत्वाचे ठरते. काम नाही पैसा नाही, जगणे मुस्किल आहे, रस्त्यावर पाय खोरुन मरण्या ऐवजी गावी जावून जगावे किंवा नात्या गोत्यात मरावे ही गर्दीमागची गावी जाण्यासाठीची भावना असते. कोरोना कोविड हा महाभंयकर रोग आपणावर कोपला आहे. अशा विषारी रोगापासून सुटका पाहिजे, जगले पाहिजे, रोगा पासूनचा धोका माहित असल्यानेच गर्दीतून दर्दी लोक पायवाट काडून गाव जवळ करतात. कारण जगण्यासाठीची धडपड आणि जगण्यातील अपरिहार्यता अशा लोकासाठी आधीक जिवघेणे असते. म्हणून प्रत्येक ठिकाणी गर्दी होतच असते. यावर शासन किंवा लोकप्रतिनिधी विचार करताना दिसत नाहीत. म्हणूनच टाळेबंदी संपण्यापूवर्वीच मुदत वाढवीली जाते. हेच कर्त्या धर्त्याचे अपयश म्हणावे लागेल. अशीच चर्चा होताना दिसते आहे.
कोरोना कोविड निर्मूलनासाठी चौफेर विचार करुन पूर्वनियोजनातून टाळेबंदी लागू केली असती तर सकस परिणाम दिसले असते. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना तसे नकोसे वाटल्याने त्यांनी झोपेतच जनतेच्या डोक्यात दगड घालून तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सहभोवतालच्याचा विचार न घेता टाळेबंदी जाहीर करुन टाकली. तेंव्हापासून गर्दीतल्या दर्दीपणा शमलेला नाही. कारण उध्दव ठाकरे हे शिवसेनेचे कार्यकारी प्रमूख असल्याने त्यांना आंदोलन करणे किंवा सरकारला धगडने यातील धोका पचणी पडला असेल. पण लोकप्रतिनिधी बनून किंवा मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्र साभांळण्याचे नेतृत्व गुण कमीच पडले असावेत, कारण ती जोखीम रोजचीच असते, केवळ नियम अटी लादून ती प्राप्त होत नाही, पंरतू आजघडीला महाराष्ट्राची कार्यपध्दती आहे ती केवळ सरकारी बाबूच्या सहकार्यावर विसंबून असावी अशीच चर्चा राजकीय वर्तूळात होताना दिसते आहे. कांही ही असले तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे धाडसाने कोरोना कोविड या महाकाय महामारी रोगानां तोंड देवून जनतेला कोविड मूक्त करीत आहेत, लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून सत्ताकारणात प्रथमतःच सहभागी झालेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गर्दीतली दर्दी पोरकीच ठेवू नये, म्हणजे झाले, हीच लोकभावना प्रकट होताना दिसते.