संपादकीय
एकच उपाय हवाबंदी...
अख्खे जग कोरोना कोविड या विषाणु रोगाने धास्तावलेले आहे. महाकाय महामारी रोगाने एवढे त्रस्त ग्रासलेले आहेत की, कोविड व्यतिरिक्त दुसरा शब्द कोणाच्याही तोंडी निघत नाही. असा कोणी ही नाही, एवढी भयानक अवस्था या कोरोना कोविड रोगाने करुन ठेवलेली आहे. जगभरातील बलाढ्य प्रगत देशानांही कोविड विषाणू रोगाने हादरावून ठेवले आहे. नको ती औषधी लस वापरुन कोरोना कोविडचा फैलाव रोखला जातो आहे. निर्मूलन केले जात आहे. पंरतू वरचेवर कोरोना कोविड विषाणूचा फास आवळतो आहे. त्यामुळे वैज्ञानीक क्षेत्रातील संशोधक तज्ञ डॉक्टर मंडळी वैद्यकीय अधिकारी हातबल झाल्यानेच चित्र दिसते आहे. अशा परिस्थितीत ही लोकप्रतिनिधी दोन हात करण्याची भाषा वापरत असल्याने कोरोना कोविड ही त्याचा श्वास मोकळा सोडीत असेल तर भुतलावरील नागरीकांचा ना विलाजच म्हणावा लागेल.
कोरोना कोविडची लागण झाल्यापासून या रोगाची व्याप्ती उत्पती त्यावरील उपाय योजना आदी बाबतीत वैद्यकीय अधिकारी त्यांचे सहकारी आरोग्य वैद्यकीय संशोधन संस्था आपापल्या परिने कोरोना कोविडवर उपायात्मक औषधी लस निर्माण करीत आहेत. अनेकानी लस उत्पत्ती केल्याचा दावा करुन तो इतर प्राण्यावर प्रयोग करीत असून त्यात यश मिळत आहे, अशी माहिती लोका समोर येताना दिसते आहे. त्यातून समाधान व्यक्त होत असतानाच कोरोना कोविडचे रुग्ण सापडले, ईथली संख्या वाढली, कित्येक मृत्यू झाला, तिथून रुग्ण बरे होवून घरी गेले अशा बातम्या येत असल्या तरी कोरोना कोविडचा नायनाट होण्याइतपत कोणाही देशात किंवा वैद्यकीय तज्ञात आजवर आल्याचे दिसले नाही. त्यात भारत हा लोकशाही प्रधाण देश ही एकमेकाकडे न पाहता केवळ प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे आज काय आदेश देणार आहेत, कोणती अट लादनार आहेत, या पलिकडे कोणाचीही वेगळी आस असावी असे वाटत नाही.
सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास ही प्रधान मंत्री नरेंद्री मोदी यांचे ब्रिद वाक्य आहे. पण तेच जनतेच्या विश्वासावर सहभागात्मक कोरोना कोविड निर्मूलनाची लढाई लढत आहेत. जिंकन्याची परिभाषा करीत आहेत, त्यातच दररोज कोरोना कोविड संदर्भात नविन अटी लादून टाळेेबंदीत शिथीलता आणू पाहत आहेत. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची कोरोना कोविड निर्मूलनाची लढाई जिंकणारच ही जी भाषा आहे, ती अगतीक आणि अनाठाई वाटते. कोरोना कोविड विरोधची लढाई म्हणजे लोकप्रतिनिधी निवडीची लोकसभा, विधानसभा निवडणूक नाही, तर ती जिवन मरणाची नैसर्गीक आप्पत्ती विरोधाची लढाई आहे हे लक्षात घेवूनच कोविड निर्मूलनाची लढाई औषधी उपचारातूनच जिंकता येते. यास दुसरा कोणताही विकल्प असू शकत नाही. हे नाकारता येण्यासारखे नाही. अशीच चर्चा होते आहे.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. देशाचा कारभार हाकालताना परदेशी व्यवहार करताना हे मागे पुढे न पाहता धडाक्यात निर्णय घेवून मोकळे होतात. मग परिणाम काय होतात ते नंतर कळतच राहते. असा अनुभव असल्याने धाडसाचे प्रतिक म्हणूनच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहवे लागेल. कोरोना कोविडने भारताला घायाळ केले. विषारी विषाणूनी महाराष्ट्राला पोखरुन टाकले, मुंबईसह महाराष्ट्रावर मेहर नजर ठेवून आहेत ते धाडशी व पारदर्शक नेते असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आहेत. कदाचीत मुंबईतील एकाद्या वार्डाचे प्रतिनिधीत्व न केलेले पण महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्या त्यांचे दुखने व त्यांच्या अपेक्षाची जाण जाणीव आणि ती त्या सोडविण्याची धमक असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नक्कीच महाराष्ट्राला कोरोना मुक्त करतील ही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे लॉकडाउन फिजीकल अंतराचे निर्बंध लादून उद्योग धंदे व्यवसाय व्यापार सारे बंद करु शकतात. टाळेबंदीत नागरीकांना घरात कोंडून ठेवू शकतात. कामगार मजूरांची उपासमार होत असेल तर त्यांना अन्न धान्य पुरवठा करु शकतात. किंवा त्यांच्या गावी पाठवू शकतात. शेवटी कोणी नियम अटिचे उलंघन केल्यास दंड व कोंडवाड्यात कोंडवू शकतात. पुन्हा पुन्हा टाळेबंदी फिजीकल अंतराचे निर्बध लादू शकतात, हे सारे कोरोना कोविड मुळेच होते आहे. कारण विषारी विषाणू म्हणजे जंतूच जंतू हे हवेतूनच मानवी शरीरात घुसतात. माणसाला रोग होतो, त्याचे निर्मूलन वैद्यकीय अधिकारी करतात. पण हे जंतू हवेतून श्वासातून संसर्गातून माणवी शरीरात घुसुन मृत्यूस कारण ठरतात. तर मग ही घातकी हवाच टाळेबंदीत समाविष्ट केली तर हवा बंदी मुळे हवाच कोंडून राहील आणि हवाच कोंडल्याने कोरोना कोविडचे विषारी जंतू ही कोेंडून मरण पावतील, टाळेबंदीत जनता वैतागली आहे. एकदाचे हवा बदी करुन कोविड मुक्त करावे म्हणजे झाले, माणव मुक्तिसाठी कोरोना कोविड निर्मूलनासाठी हवाबंदी ही एक लढाई, हाच एक उपाय, म्हणून हवाबंदी हाच पर्याय आहे, अशीच लोकभावना प्रकट होताना दिसते आहे.