कोविडमुळे चुका झाकण्याची संधी
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः भारत महासत्ताक बनला पाहिजे, आपलीच सत्ता असली पाहिजे, असे प्रत्येक राजकारणी व्यक्तीस मनोमन वाटत असते. त्या पैकीच नरेंद्र मोदी हे एक लोकप्रतिनिधी आहेत. नेहमीच्या सवई प्रमाणे परदेशातून आलेल्या कोरोना कोविड या विषारी रोगाचे निर्मूलन करणेसाठी विषाणूचा फैलाव होवू नये यासाठी केंद्रीय मंत्री मंडळ किंवा राज्य सरकारला सुचना न देता किंवा चर्चा न करता, देशभरात लॉकडाउन व सामाजीक अंतराचे निर्बंध रातोरात लादले. आणि तो निर्णय सहकारी व राज्य सरकारना दिला. यातच मागील स्वतःच्या चुका झाकण्यासाठीची ही आयती संधी मिळाल्यानेच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना कोंडवून टाकून देश विकलांग केला. याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर झाला, आणि अर्थकारणच बदलले. पण केंद्र सरकारची निती बदलली नसल्याने काय होईल अशी चिंता बळावत असल्याचे मत मुंबईतील पत्रकारातून व्यक्त होताना दिसते आहे.
कोरोना कोविड निर्मूलनासाठी टाळेबंदी लादून गरीब कामगार मजूरांना वेठीस धरुन त्यांना जगणे मुस्किल करुन टाकले. याचे दुःख महासत्ताधीश बनु पाहणार्या प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना कसे कळणार आणि टाळेबंदीत कोण जगतो, कोण मरतो, याचे भान नरेंद्र मोदी यांना का ठेवावे अशीच चर्चा होत असून केवळ नोटा बंदी भुसंपादन जीएसटी कर लादने वैगेरे चुका झाकण्यासाठी महाकोविड लागन आणि ती निर्मूलन करणेसाठी ती नाममात्र संधी ठरली. त्यातुनच टाळेबंदी फिजीकल अंतर लादले गेले, त्यात नवल काय, भोग आला तर भोगावाच लागेल, अशा परिस्थितीत जनता असून झाकलेले उघडेच होते, हे सत्ताधिशानी लक्षात घ्यावे, ठेवावे, असेच मत पत्रकारीतेच्या वर्तूळात होताना दिसते आहे.