टाळेबंदीतील नागरीकासह पाणी पुरवठा व आरोग्य सुविधा पुरवाव्यात
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड निर्मूलनासाठी वैद्यकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पालक मंत्री, आणि स्थानीक राजकीय सामाजीक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था,पत्रकार आणि जानकार नागरीक हे युध्द पातळीवर कार्यरत असून लातूर शहर व जिल्हा कोरोना मुक्तच आहे. बाहेरुन आलेल्यानी निलंगा, उदगीरसह लातूरला डाग लावला असताना ही जनता स्वतःची रक्षक बनल्यामूळे कोरोना कोविड निर्मूलना बाबतील सुचना अहवान करणे ऐवजी लातूर शहरासह जिल्हाभरातील पाणी टंचाई व आरोग्य सुविधेचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीने लक्ष देवून सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरीकातून होताना दिसते आहे.
लातूर शहराला व जिल्हाभराला पाणी पुरवठा करणारे धरणे डॅम तळाला लागले असून लातूर शहराचा तर पाणी प्रश्न अधिकच गंभीर असल्याने लातूरचा पाणी प्रश्न व आरोग्य सुविधा आदी बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवून गरजू समस्यांचे निवारण करावे अशी मागणी होताना दिसते आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे डॅम काल उपसा करुन किंवा पुर्नभरण करुन पाणीसाठा वाढवावा आणि काटकसरीने पंरतू नियमीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरीकातून होते आहे. कोरोना कोविड चा फैलाव सुरु असताना ही लातूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असून अनेक भागात कचरा साचला असून गटारी तुडूंब भारलेल्या आहेत. याकडे मनपा प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधीने लक्ष घालून टाळेबंदीसह नागरीकांची सुविधा उपलब्धतेसह पाणी टंचाई दुर करुन न्यायीक पाणी पुरवठा व आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरीकातून व्यक्त होताना दिसते आहे. या संदर्भात दैनिक लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने गंजगोलाईच्या पूर्वभागात अनेक वस्त्या मध्ये फेरफटका मारला असता बर्याच ठिकाणी कचरा साचलेला आणि गटारी तुडूंब भरलेल्या दिसत होत्या, त्यावेळी कांही लोकांना विचारले असता कचरा उचलणारी गाडी एक दोन दिवसा आड येते पण गटारी साफ करणारे कामगार ईकडे फीरकत नाहीत, अशा तक्रारी तेथील नागरीकांनी केल्या.