४४ पैकी ४० व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह

४४ पैकी ४० व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह, पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार करताना संपर्कात आलेले डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ, व वर्ग ४ कर्मचारी यांचा समावेश



लातूर (जि.मा.का) :  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक २०.०५.२०२० रोजी एकुण २४६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ४४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  ४० व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन (त्यामध्ये पॉझिटीव्ह व्यक्तींवर उपचार करताना संपर्कात आलेले डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ व वर्ग ४ कर्मचारी यांचा समावेश आहे ) ही अत्यंत दिलासादायक बाब आहे व एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive)  आला असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे उर्वरीत २ व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत. 
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण १२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. निलंगा येथुन १३ व्यक्तींचे  स्वॅब तपासणीसाठी आले हाते त्यापैकी ११ व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत.  देवणी १२, जळकोट ५, रेणापूर ६, स्त्री रुग्णालय लातूर येथील ४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  लातुर जिल्हयातील असे एकुण ९६ स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ८९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  एका व्यक्तींचा अहवाल  पॉझिटीव्ह आला आहे, एक व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे व ५ व्यक्तिचे अहवाल प्रलंबित आहेत.
 तसेच बीड जिल्हयातील११३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ९० व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व ६ व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असून १३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील ३७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ३३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  ४ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत असे एकुण आज २४६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन २१२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व ७ व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व २२ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' भागात १००- १५० मिमी पावसाची शक्यता!*

  *मुंबई :* पुढील २४ तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरी, ...

लोकप्रिय बातम्या