टाळेबंदीतील संस्थालतरीची अवस्था मानव निर्मितच

टाळेबंदीतील संस्थालतरीची अवस्था मानव निर्मितच 



 दिल्ली (दै.लातूर प्रभात प्र) ः कोरोना कोविडने देशाला ग्रास्तून टाकले.  कोविड विषाणूचा नायनाट करणे ऐवजी वैद्यकीय तज्ञे किंवा जुन्या जानत्या अनुभवी राज्यकर्ते अथवा प्रशासनाला विचार विनिमय न करताच ऐनवेळी आक्रमभावनेतूनच मागचा पुढचा विचार न करता केंद्र सरकारने कोविड निर्मूलनासाठी टाळेबंदी लागू केली आणि टाळेबंदीतील स्थालांतरीतांची अवस्था बिकट झाली.  ती मानव निर्मित म्हणण्याऐवजी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचीच चुक असावी असे स्पष्ट मत प्रसिध्द इतिहासकार तथा अर्थ शास्त्रज्ञ रामचंद्र घुहा यांनी स्पष्ट केल्याने सर्वत्र गांभीर्याने चर्चा होताना दिसते आहे. 
 कोविड या विषारी विषाणूमूळे महाकाय रोगाचा फैलाव झाला, सार्‍या जर्गाला भयभित करुन टाकले.  भारतात संक्रमन होताच या कोविड रोगा संदर्भात वैद्यकीय अधिकारी तज्ञ मंडळी आणि जुन्या लोकप्रतिनिधीना कोविड संदर्भात विचार विनिमय न करताच एकहाती निर्णय घेवून टाळेबंदी लागू केल्यामूळे आजची अर्थव्यवस्था ढासलेली ती टाळेबंदीमूळेच आहे, असे स्पष्ट करुन कोरोना कोविड ने देश गांगरुन सोडला आहे.  कारण ज्यावेळी भारत पाक फाळणी झाली, त्यावेळची अवस्था भयावह होती.  तशीच अवस्था कोराना कोविड रोगा मुळे झाली आहे.  याचे मुळ कारण टाळेबंदी लावण्याची घाई झाली असावी असेच म्हणावे लागेल.  कारण हिंसाचार नसला तरी भयानक भितीआत्मक अवस्था निर्माण झाली ती टाळेबंदी मूळेच झाली.  कदाचीत टाळेबंदी पूर्व सल्लामसलत झाली असती तर हे दिवस आले नसते, त्यामूळे आज जे टाळेबंदीमूळे कामगार मजूरांना बेकारीचे दिवस लागले आहेत, देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली त्यास टाळेबंदी कारणीभूत आहे, असे स्पष्टीकरण करुन टाळेबंदीत शिथील करुन मुक्त सर्व क्षेत्रीय वातावरण निर्मिती केली तरच देशाची आर्थिक घडी बसेल असे स्पष्टीकरण रामचंद्र घुहा यांनी केले.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या