घराबाहेर पडायचे नाही म्हणून ...

घराबाहेर पडायचे नाही म्हणून ...


     लातूर (दै.लातूर प्रभात प्र) ः कोरोना कोविडची लागण झालेली आहे.  कोविड बिमारीचे निर्मूलन करणे प्रसंगी संबधीतांना सल्ला देणे, हे गरजेचे असते, मी मंत्री आहे म्हणून मला नियम अटी नाहीत, असे नाही, मला ही टाळेबंदीत राहूनच सर्वकांही करावे लागते.  घरा बाहेर पडायचे नाही म्हणून सारी सुत्रे घरातूनच हालवीतो आहे, दुरचित्रवानी संदेशाद्वारे संपर्कात आहे, अधिकारी नागरीकांना बोलतो आहे, बाहेर नसलो तरी राज्यभरात फिरतो आहे, घरातून सारी यंत्रणा हालवितो आहे, त्यामूळे लातूर उदगीर, जळकोट, असा भेद न करता राज्यावरच लक्ष ठेवावे लागते, त्यातून कमी जास्त असेलच पंरतू मंत्री म्हणून मी इतरापेक्षा कांकणभर जास्तीने शासकीय व सामाजीक कार्य करीत आहे, हे माझे कर्तव्यच ठरते.  त्यामूळे केवळ मतदार संघच म्हणून नाही, तर संपूर्ण राज्यच माझा मतदार संघ आहे, त्यामूळे माझ्या संदर्भात गैरसमज करु नये, अशीच चर्चा मंत्री महोदय करीत असताना दिसतात. 
     मतदार संघ किंवा वास्तवाचे ठिकाण हे बंधनकारक नाही, कारण महाराष्ट्र मंत्री मंडळातील एक मंत्री असल्याने राज्यातील सर्वांचे काम करावे लागते.  किमानपक्षी लातूर जिल्हा म्हणूनच बसता येत नाही, तर राज्यातील जनतेची कामे करावीच लागतात.  त्यामूळे मतदार संघ हे घर समजून घरातील कामे मागे पडली तरी चालतील पंरतू दुसर्‍यांची कामे झाली पाहिजेत म्हणूनच मी घरा पेक्षा घरा बाहेरील कामाकडे लक्ष देतो, कोविड मुळे घरात असलो तरी प्रसार माध्यमातून घरा बाहेरच आहे, अशी चर्चा कामासाठी गेलेल्या लोकासमोर मंत्री महोदय करीत असल्यामूळे फिजीकल अंतराच्या भितीपोटी जास्त कांही बोलता येत नाही, म्हणून आम्हा मतदारांची तारांबळ होते आहे, मंत्रीच अशी वागणूक देत असतील तर त्यांचे सहाय्यक काय करतील हे कळत नसल्यामूळे कोणाकडे जावे हा प्रश्‍न भेडसावीत असल्यामूळे प्रत्यक्ष भेटीसाठी घर की विश्रामगृहाकडे शोधावे हेच कळत नसल्याची चर्चा नागरीकातून व्यक्त होताना दिसते आहे.  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या