मध्यम, मागासवर्गीयांची परिस्थिती कोण बदलणार

मध्यम, मागासवर्गीयांची परिस्थिती कोण बदलणार


मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.)ः कोरोना कोविडच्या महासाथी रोगाने भारतासह महाराष्ट्राला पळता भुई थोडी केली आहे.  मिळेल त्या औषधी लस चा वापर करुन कोविड बाधीत रुग्णावर उपचार केले जात आहेत.  कोरोना कोविड संशयीतग्रस्तांची बाधीतांची, रुग्ण संख्या वाढतच आहे, उपचारा दरम्यान रुग्ण बरे होत आहेत.  मृत्यूची संख्या ही अटोक्यात येत आहे, पण टाळेबंदी सामाजीक अंतराच्या निर्बधात जनता आजही कोंडूनच असल्याने मध्यमवर्गीय मागासवर्गीय जनतेची परिस्थिती अधिकच बिघडत असून त्यांचे मरण स्वस्त होत असल्याने ती परिस्थिती कोण बदलणार असाच प्रश्‍न सर्वासमोर पुढे येताना दिसतो आहे. 
 निवडणूक काळात ज्या गरीब कष्टकरी मध्यमवर्गीय मागासवर्गीयांना अमिषे दाखवून राजकीय पक्षानी सत्ता हस्तगत केली.  तेच लोकप्रतिनिधी आज याच वर्गाना वेठीस धरुन सत्ताकारण करीत असल्याने परिस्थिती अवघड होत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.  टाळेबंदीमुळे लाखो मजूर डोक्यावर गाठोडे घेवून गांवाकडे जात आहेत.  खांद्यावर बोजा, कडेवर लहान बाळ, कोणाच्या खांद्यावर वृध्द आई वडीलांची कावड, तर कोणी गर्भवती महिला रस्त्यातच प्रसूती होते.  हे वास्तव झाकू शकत नाही, तरी ही बडेजावी मोठेपणासाठी मागच्याकाळात गुजरात मध्ये अमेरिकेचे ट्रम्प आले असताना त्यांना गरीबी दिसू नये त्यासाठी मध्यवर्गीय मागासवर्गीयांना भिंतबाधून झाकून ठेवले होते.  ते कृती गुजरातवासी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचीच होती.  आजघडीला केंद्र व राज्य सरकार गरीब कष्टकरी कामगार मजूर मध्यम मागासवर्गीयाना बाजूला सारुन त्यांच्या आधारावर सहकार्यातून कोरोना लढाई लढत आहेत.  पंरतू त्यांनाच कोंडून व रस्त्यावर ढकलूनच असेच चित्र सर्वत्र दिसते आहे.  अशी परिस्थिती कोण बदलणार हा प्रश्‍न सर्वसामान्याना भेडसावीत असून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अशा वर्गाना डावलून कोरोना कोविड निर्मूलनासह सत्ताकारण करणार आहेत का, आणि त्यात ते यशस्वी होतील काय, अशीच चर्चा होत असली तरी मध्यम, मागासवर्गीयांची परिस्थिती कोण बदलणार हा प्रश्‍न कायम स्वरुपी सरकारी अंजेड्यावर राहाणारच असल्याने तो प्रश्‍न अर्नितच राहतो यात शंका नसावी आणि याला जाब विचारणारी व्यक्ती समोर आल्याशिवाय सरकार जागे होणार नाही, अशीच शंका लोकसामान्यात व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या