संपादकीय...संयमाला अंत हवा...

संपादकीय...


संयमाला अंत हवा...


मानवी जिवनात संयम आणि शिस्तीला दुसरा पर्याय नाही.  संयम आणि शिस्तीच यशाचे गुरुकिल्ली असते.  प्रत्येकाला जगण्याची कांही तरी करण्याची इच्छा अकांक्षा असतेच. त्या इच्छा अकांक्षासाठी मर्यादा असाव्या लागतात.  छोटी गोष्ट डोंगरा एवढी होवू शकते पण डोंगरा एवढी गोष्ट काचेच्या गोष्टी एवढी छोटी होवू शकत नाही.  ती बाब समजण्याइतकी भावनीक माणसीक आणि बौध्दीक कुवत आणि वैज्ञानीक उंची असावी लागते.  ती मिळविण्याची क्षमता किंवा नाकारण्यासाठीची क्षमता ही तेवढीच महत्वाची असते.  त्यामूळे संयश आणि शिस्तीला अनन्येसाधरण महत्व आपोआपच प्राप्त होते.  
 यशाचे शिखर गाठण्यासाठीची क्षमता भौगोलीक परिस्थिती आणि जिद्द ही तेवढीच महत्वाची असते.  मनातूनच शिक्षीत होवून नौकरी करायची आहे, अधिकारी बनायचे आहे, कुशल शेतकरी, उद्योजक, व्यापारी व्हायचे आहे, किंवा सामाजीक राजकीय कार्यासह लोकप्रतिनिधी, शासक, प्रशासक बनायचे आहे, ते प्रथमतः निश्‍चित केले पाहिजे.  त्यानंतर ते धेय्य अवगत करण्यासाठी प्रयत्नातून यशोशिखर गाठता येईल आणि ते यश मिळेलच पण ते यश ती जबाबदारी पेलने आणि ती जबाबदारी टिकविणे आणि त्यातून यशस्वी होणेसाठी खबरदारी ही घ्यावी लागते.  अशातच आजच्या सारख्या कोरोना कोविड अशा संसर्गीक रोग तुमच्या आमच्या मानगुटीवर बसला तर सारं कांही विचारण्यापलिकडे जावून संशयमावर येवून ठेपते.  आणि शिस्त गांगरुन सोडते.  मग यश कोठे शोधू असाच प्रश्‍न आम जनतेला भेडसावताना दिसतो ही बाब नाकारता येत नाही.  
 आपण सारे भारतीय विज्ञान युगात लोकशाही मार्गाने जिवनाचा आनंद लुटत आहोत.  सुख दुःखाना सामोरे जावून, आडीअडचणीवर मात करुन आलेल्या साथी रोगाना प्रार्वत्त करुन जगण्याची धडपड आपण करीत असतो.  पण जगणे आणि मरण हे एकाच वाटेवर असल्याने संयम आणि शिस्तीला कवठाळून मरण स्विकारणे ऐवजी दुसरा पर्यायच आपल्याकडे शिल्लक राहत नाही. त्यामूळे जगण्यातल्या इच्छा आकांक्षा सोबतच्या बोचक्यात गुंडाळून यशोमय शिखराला मागे टाकून आजघडीला स्वस्त झालेल्या मरणाला स्विकारावे लागते, ही आजच्या विज्ञान युगातील महासत्ताक अधुनिक भारताची कोंडी झालेली दिसते.  मग दोष कोणाला द्यावे, याचे उत्तर केवळ मरणातच असावे अशी परिस्थिती झाल्याची चर्चा होताना दिसते आहे. 
 भारताला कोरोना कोविड या संसर्गजन्य महाकाय विषारी रोगाने पोखरुन टाकले आहे.  सारे जनता भयभीत होवून सैरभैर झालेली आहे.  प्रत्येक नागरीक घायाळ होवून सरकारी अटी नियम पाळण्यातच व्यवस्त झालेल दिसतो आहे.  काम धंदा, नाती गोती, बायको लेकर, नौकरी चाकरी, सुख दुःख, मान अपमाण, हे सारं बाजूला सारुन एकट्यानेच टाळेबंदी, सामाजीक आंतराचे पालन करायचे, केंद्र व राज्य शासनाच्या नियम व अटीचे पालन करायचे आणि अनावधानाने चुक झाली तर दंड भरुन घरचे कारागृह सोडून सरकारी कारावासात जावून चाचपडत राहने हेच आजचे कर्तव्य ठरते आहे.  तेही शिस्तीचे पालन करुन संयमाने वागणे, राहणे हे बंधनकारकच आहे.  कारण कोरोना कोविड मुक्तिची लढाई जिंकायची आहे.  त्या लढाईतील आपण सारे नागरीक सैनिक आहोत, बाकी प्रशासक, शासक हे सेनापती आहेत.  त्यामूळे सेनापतीच्या आदेशाचे संयमाने व शिस्तीने पालन करुन तसा अनुनयही केला पाहिजे, हेच आध्यकर्तव्य ठरते. 
 छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात सेनापती हे बहुजन समाजाचे तर सैनिक अठरापगड जातीचे होते, तसा काळ आजचा नाही, छत्रपतीच्या वारसाकडे आजची सत्ता असल्याने संयम व शिस्तीला अधिकचे महत्व आहे.  म्हणूनच कोरोना कोविडचा पाडाव करायचा असेल, कोविड मुक्त महाराष्ट्र भारत करायचा असेल तर बंधन शिस्त पाळलीच पाहिजे, संयम बाळगलाच पाहिजे, अन्यथा कोरोना कोविडचा फास गळ्या भौवती आवळलाच जाईल यासाठी सर्वकांही सहनकरा पंरतू अशा या महामारीच्या समयी प्रत्येक नागरीकांनी संयम व शिस्तीने टाळेबंदीचे सामाजीक अंतराचे पालन केलेच पाहिजे.  त्याशिवाय मुक्ति नाही असे आदेश आपणासर्व सैनिकाना सेनापतीने दिले असल्यानेच आज कोविड स्थिर असल्याचे जानवते आहे. 
 लोकशाही राज्यात सरकारी आदेश टाळेबंदी व सामाजीक अंतराचे निर्बध पाळलेच पाहिजेत म्हणून शासन किंवा मालकाला शेजार्‍याला त्रास नको म्हणून गांव जवळ करणेसाठी पायवाट करावी लागते.  त्यात नियम भंगामुळे सरकारी कोंडवाडा आहेच. त्यातूनही सुटका मिळाली तर आपघाती मृत्यू आहेच. शासकीय आदेशानुसार जाताना वाहनाची धडक बसुन मृत्यू किंवा मनमानी पणे गाव गाठताना रेल्वेखाली चिरडून अपघाती मृत्यू येणे हेही नशीब लागते.  जिंवत असताना न्याय व हक्क मिळाला नाही, मिळत नाही, पण रेल्वेखाली चिरडल्याने मागच्याना वारसाना पाच दहा लाख रुपये मिळता आहेत, हेही नसे थोडके.  कारण हे सारं मिळतय ते केवळ संयम बाळगणे व शिस्तीचे पालन केल्यामूळेच म्हणूनच संयम व शिस्तीला अंत हवा असतो.  त्यातच न्याय व हक्क दडलेला असतो.  यामूनच आम जनतेची कोरोना कोविड पासून मुक्ति होईल, न होईल पंरतू मृत्यू झालेल्यांची कोरोना कोविड मधून मुक्ति झाली यात संदेह नसावा अशीच दुःखद पण लाभार्थी चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या