संपादकीय...आडवलय कोणी...

संपादकीय...


आडवलय कोणी...


केंद्र सरकार पासून राज्य सरकार पर्यंतचे सर्वच जेष्ठ लोकप्रतिनिधी कोरोना कोविड निर्मूलन त्यावरील उपाय आणि नागरीकांच्या समस्या निर्मूलना करीता रोज बैठका घेत असतात.  प्रधान मंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि त्यांनी नियुक्त केलेले उच्च पद्स्थ अधिकारी प्रामुख्याने बैठका घेवून आजची अवस्था आणि उद्याची योजना जनते समोर ठेवीत असतात.  कोरोना कोविडचा होणारा फैलाव त्यावरील उपाय आणि नागरी समस्या निवारण्यासाठी होणारे प्रयत्न त्यातून जनतेला सावधगीरी राखणे संबधीच्या सुचना वेगवेगळ्या अटिचा त्या बैठकीतला मसुदा असतो, अशा या बैठका नित्यानेच होत असतात.  बैठका घेणारे घेत असतात, आदेश व आटी लादनारे लादतात, पण त्या अटी व आदेशाचे पालन करणारे मात्र हकनाक जिवघेण्या त्रासाला बळी पडतात.  हे वास्तव बैठकीत कोणी चर्चीत असेल असे वाटत नाही.  
 कोरोना कोविड निर्मूलनासाठी व त्याचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी आणि सामाजीक आंतराचे निर्बध लादले गेले, त्याचा गोषवारा घेण्यासाठी नेहमीच्या बैठकी प्रमाणे परवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची दुरचित्र संवादाद्वारे बैठक घेतली आणि सर्वच उपस्थितांनी सुचना पाऊस पाडला.  असे या बैठकीचे चित्र स्पष्ट होते.  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीपासून आम्ही सरकार बरोबर असून आजही आहोत, मात्र वरिष्ठ अधिकार्‍यात समन्वय दिसून येत नाही अशा बाबीकडे नेतृत्वाने लक्ष द्यावे आणि कोरोना कोविडचे निर्मूलन करुन जनतेला लॉकडाउन मधून मूक्त करावे असे स्पष्ट केले.  तर टाळेबंदीच्या काळात परिस्थिती हाताळण्यासाठी एसआरपीला पाचारण करावे अशी सुचना केली.  अनेकांनी क्वॉरंटाईन क्षेत्रा मध्ये भोजनासह सुविधा ही योग्य रितीने द्याव्यात, संघटीत कामगार, मजूर मोलकरीन आदीना आर्थिक आधार देवून मार्केटींगची व्यवस्था करावी, मालमत्ताकर उपकर स्थगीत करावेत, प्रवाशाना रेल्वेची सोय करावी, बाराबलूतेदारांची सोय करुन रॉयल्टी लागू करु नये, शेतीमालाची खरेदी करावी, राज्यात अडकलेल्यानां त्याच्या त्याच्या गावी जाण्याची मुभा द्यावी, यासह टाळेबंदी वाढविण्यासंबधी ही चर्चा झाली.  पंरतू अन्न धान्य वाटपातील सोयी गैरसोयी आणि अधिकची वाटपातील गैर चर्चा झाली पण त्यावर काय कारवाई करावी अशी चर्चा झाली नसल्याचे दिसते.  ही बाब नाकारण्यासारखी नाही.
 गरजेला अक्कल नसते, भुकेला लाज नसते, म्हणून अडकलेले लोक घरी जाण्यासाठी प्रयत्न करतात.  त्याना डांबून ठेवले जाते, नियमाच्या कचाट्यात अडकविले जाते.  काम धंदा नाही, हाती पैसा नाही, टाळेबंदी आहे, उपासमार होते म्हणून मग मोफत धान्यासाठी रांग लावावीच लागते.  अन्नाचे पॉकीट घ्यावेच लागते.  यात अक्कल आणि लाज आपोआपच निर्जीव झालेली असते.  ही कळ वेदना, वातानुकलीत कक्षातील किंवा खुर्चीतल्या साहेबांना कशी कळणार आहे, ते शक्यच नाही, अशा साहेबांना केवळ अटी लादने, आदेश जारी करणे व नकळत कोणी चुकलेच तर त्यांना दंड व कोंडवाडा आहेच, हे सत्य कोणी नाकारणार नाहीच.  
 लोक न्यायासाठी, जनतेच्या सोयीसाठी, कोरोना कोविडचे निर्मूलन करणेसाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाला कोणी अडविले आहे.  सरकारी कलम आणि पोलीसी दंडूक्यासमोर कोणाची मजाल आहे, नियम व अटी बंदी नाकारण्याची पण कांही तरी बोलून लोकांना दिशाभुल करणार्‍या या बैठका कोरोना कोविडचे निर्मूलन करु शकतच नाही, कारण यांच्याकडे या भयावह विषाणूचे निर्मूलन करण्यासाठी औषधी ना लस आहे, केवळ आहेत त्या औषधीवर चाल करुन जनतेला वेठीस धारणार्‍या या सरकार व सरकारी बाबूला काय म्हणून संबोधावे हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो. 
 साप, मुंगूसाची जसी जिवघेणी टक्कर चालू असते तशीच टक्कर शासन प्रशासन आणि नागरीकात होताना दिसते आहे.  टाळेबंदीत नागरीक मेले काय, आणि जिवंत राहिले काय याचे देणे घेणे सरकारला ना सरकारी बाबूला नाहीच, ते फक्त कार्यरत आहेत, साधले तर माझ्या-आमच्यामुळे आणि बिघडले तर तूमच्या मुळे म्हणून हातवर करुन सांगायला तयारच आहेत.  यात होरपळतो तो नागरीकच हि समस्या कोरोना कोविड या संसर्गापेक्षा ही भयानक असावी अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. कोरोना कोविड या रोगाचे निर्मूलन करणेच्या लढाईत नाहक्क सामान्य जनतेला भरडता कशाला, ही आर्तहाक कोणी ऐकायला तयारच नाही.  टाळेबंदी जगू देत नाही, आणि मरु ही देत नाही अशी अवस्था आज सर्वसामान्य जनतेची झाल्याचे चित्र दिसते आहे.  पण वाली कोण आहे हा प्रश्‍न जशाच तसाच राहतो, ही अडचण वाटते.  
 मुकी हाकी तिला वाली कोण, अशीच गत सर्वसामान्य गोरगरीब मजूरांची झाली असून त्यांना न्याय देणे बाजूलाच पण कोरोना कोविड मुक्तितर कोठ होते, हे असेच करावे, ते तसेच करावे, असे करु, तसे करु म्हणून बैठका घेतात, आम जनतेला धिर देतात, त्यात न्याय देवू म्हणता मग हे सारे करायला कोणी अडविले आहे.  कायदा काणून तूमच्या हाती आहे.  आम्ही फक्त याचक आहोत, न्याय व हक्क मागतो आहोत.  तूमच्या सारखे नव्हे पंरतू किडा मुंगी किंवा पशू प्रमाणे तरी जगू द्या म्हणतोत.  कोंडून ठेवू नका म्हणून जे कांही करायचे ते करा तूमचा रस्ता मोकळा आहे.  अडविणारा कोणी नाही, एवढेच लोकासमोर शिल्लक आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या