तथागत बुध्द हे एक नाव व्यक्ती नसून पवित्र विचार
दिल्ली (दै.लातूर प्रभात प्र.)ः आजघडीला कोरोना कोविड संसर्गामुळे देशात चिंता, दुःख, निराशा, दिसून येत असताना मानवी शांती व प्रवर्तनासाठी तथागत भगवान बुध्दाची शिकवण व विचारच दिशादर्शक ठरु शकतात, असे स्पष्ट करुन बुध्दाचे तत्वज्ञान हे मानवाला निरंतर प्रयत्न करायला हवेत. जेनेकरुन कठीण काळात परिस्थितीवर विजय प्राप्त करता येईल. थकुन थांबने हा पर्याय असूच शकत नाही, असे स्पष्ट करते, म्हणून बुध्द तत्वज्ञानाशिवाय दुसरा पर्याच असूच शकत नाही, असे स्पष्ट मत प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते बुध्द पौर्णिमादिना निमित्ताने व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून संबोधीत करीत होते.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, बुध्द हे एक नाव किंवा व्यक्ती नसुन बुध्द एक विचार एक संस्कृती आहे. पवित्र विचारातून संकट दुर करण्याचा संकल्प व संदेश देवून बुध्दाने भारताची सभ्यता संस्कृतीला नेहमीच दिशा दाखविली असून जगाला शांतीचा संदेश दिला आहे. भगवान बुध्दानेच भारताची संस्कृती समृध्द केली असून आजच्या कठीण काळात भगवान बुध्दाची शिकवण दिशादर्शक असल्याचे मत ही प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
दरम्यान देशभरात कोरोना कोविडग्रस्ताची बाबीताची संख्या वाढत असली तरी बरेच रुग्ण बरे होत आहेत. तर मृत्यूचा दर स्थिरावला असल्याने टाळेबंदी व सामाजीक अंतरामुळे सर्वसामान्य जनतेसह कामगार मजूरांचे हाल होवून उपासमारी होवू नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह गोरगरीब मजूरासाठी विशेष बाब म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना कार्यान्वीत करण्यात आली असून पूर्वीपेक्षा दुप्पट धान्य पुरविण्याचे आदेश राज्याना दिले असून त्यात दिरंगाई किंवा गैर प्रकार होत असतील तर विनाविलंब संबधीत अधिकारी मंत्री मुख्यमंत्री अथवा केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालय किंवा पंतप्रधान कार्यालयाशी नागरीकासह सामाजीक कार्यकर्त्यानी संपर्क साधावा असे अहवान ही प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.