लातूरात तथागत गौतम बुध्दाची जयंती साजरी

लातूरात तथागत गौतम बुध्दाची जयंती साजरी


लातूर (दै.लातूर प्रभात प्र.)ः जगाला शांतीचा संदेश देणारे स्वर्ग-नरकाला टोकरुन मानव मुक्तिच्या लढाईतील अग्रणी यौध्दे जगश्रेष्ठ महामानव तथागत गौतम बुध्द यांची जयंती लातूर मनपाची परवानगी घेवून आंबेडकर पार्कवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पीत करुन तथागत बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली तर वैशाली बुध्द विहार आणि श्रावस्ती विहारात ही बुध्द जयंती साजरी करण्यात आली.  जिल्हा प्रशासन आणि लातूर महानगरपालिकेला बुध्द जयंतीचे महत्व नसल्याने व ते अन्भिज्ञ असले तरी तशी जाणीव लातूर येथील कार्यकर्त्यानी करुन दिल्यानंतर कोरोना कोविड च्या धास्तीमुळे आणि टाळेबंदीतील अटीतूनही लातूर येथील आंबेडकरी जनतेने आंबेडकर पार्क, विहार आणि घराघरात बुध्द जयंती साजरी करुन बुध्दाना मानवंदना तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.  
 राज्याचे पाणी पुरवठा, बांधकाम, पर्यावरण, संसदीय कार्यराज्यमंत्री संजय बनसोडे हे लातूर येथे असताना ही ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर येवू शकले नाहीत, किंवा जिल्ह्याचे पालक मंत्री आणि जिल्हा प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली असावी या कारणामुळे मंत्री संजय बनसोडे हे आंबेडकर पार्कवर उपस्थित राहू शकले नसावेत, त्यातच बनसोडे यांनी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रामेगांव परिसरातील सातकर्णी नगरातील महाविहारात भन्ते पय्यानंद यांच्या समवेत बुध्द जयंती साजरी केली असल्याने सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या