कोरोना कोविड मुक्तिच्या लढाईत, लातूर मनपाची आरोग्य व्यवस्था ढासळली

कोरोना कोविड मुक्तिच्या लढाईत


लातूर मनपाची आरोग्य व्यवस्था ढासळली



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.)ः कोरोना कोविडच्या संसर्गाने महाराष्ट्राला घेरले, तेंव्हापासूनच लातूरला कोविडची लागण होवू नये म्हणून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग जागृत राहून रोगराईवर उपचार करीत होते.  पंरतू डाग लागला असला तरी लातूरचे वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशासनाने रात्रनदिवस राबून कोरोना कोविड या संसर्गजन्य रोगाला स्थिर ठेवलेले आहे.  त्यातच पालक मंत्री अमित विलासराव देशमूख आणि राज्य मंत्री संजय बनसोडे हे ठाण मांडून बसल्याने आरोग्य व्यवस्था वैद्यकीय उपचार यंत्रणा कार्यरत झाली.  त्यात जिल्हा प्रशासनही गतीमान बनले पंरतू लातूर महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था आजतागायत असून नसल्यासारखीच होती.  ती आज कधी तरी कांही तरी केल्यासारखेच दिसते आहे.  पंरतू आजघडीला कोरोना कोविड मुक्तिच्या लढाईत लातूर मनपाची आरोग्य व्यवस्था ढासाळली असल्याचीच चर्चा होताना दिसते आहे.  


मध्यंतरी लातूर महानगरपलिका प्रशासनाने कार्यालयातच कोविड निर्मूलनासाठी वॉररुम स्थापन केल्याची चर्चा होत होती.  पंरतू या वॉररुम मधून कोणत्या रोगावर वार केले गेले, याचा ठावठिकाणा आजतागायत लागलेला नाही. तरी ही पुन्हा शहरात जंतू नाशक फवारणी नाली साफसफाई होत असल्याचे मनपा प्रशासनाने वृत्तपत्रातून जाहिर केले.  पंरतू कोविड निर्मूलनासाठी कोठे साफसफाई होते आहे, जंतू नाशक फवारणी होते आहे, याचा मागमूस लागत नसल्याने दैनिक लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने लातूरच्या पूर्वभागातील परिसरात चौकशी केली असता सफाई कामगार चौकात दिसतात पण कोठे सफाई करतात हे माहित नाही असे सांगीतले गेले, तर जंतू नाशक फवारणी कधी रस्त्यावर कधी घरा घरतच करणेसाठी आदेश असल्याचे संबधीत कर्मचार्‍यानी सांगीतले.  मोकळ्या जागेत किंवा गवत कचर्‍याच्या ठिकाणी फवारणी करण्यासाठी अधिकार नाहीत, असे सरळ उत्तर देवून फवारणी करणार्‍या कर्मचार्‍यानी आपापला मार्ग धरला त्यामूळे लातूर मनपा प्रशासना बाबत उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.  
 अनेक प्रभागात जंतू नाशक फवारणी मोजक्याव मोक्याच्या ठिकाणी करुन त्या संबधीत व्यक्तिची सही घेवून प्रभागाची हजेरी दाखविली जाते, अशीच गत घंटा गाडीची असून कचरा हा दोन दिवसा आड उचलला जातो, अशी चर्चा नागरीकातून होत असून रस्ते दुरुस्ती नाली दुरुस्ती सफाई जंतू नाशक फवारणी ही केवळ कागदी कारवाई असून अशा या प्रभागातील स्वच्छता निरिक्षक किंवा नगरसेवक फिरकत नसल्यामूळे सफाई कामगारांचा मनमानी कारभार आणि मनपा आरोग्य विभागाची निष्क्रीयता यामुळे कोरोना कोविड निर्मूलनासाठी लातूर महानगरपालिका प्रशासनाने कसलीच कारवाई केली नसल्याची तक्रार जानकार नागरीक करीत असून या भागाकडे नगरसेवक महापौर, शासकीय अधिकारी लक्ष का देत नाहीत, तेच कार्यरत आहेत की नाही, अशी चर्चा होत असली तरी लातूर मनपाचे हे कार्यक्षम अधिकारी नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि सफाई कामगार हे कोरोना कोविड निर्मूलनासाठी भिवंडी, धारावी, मुंबई, औरंगाबाद येथील साफसफाई स्वच्छतेसाठी गेले आहेत की काय, अशीच चर्चा होत असून कोरोना कोविड मुक्तिच्या लढाईत मनपा आरोग्य व्यवस्था ढासाळली अशीच गंभीर चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या