रेल्वे अपघात प्रकरणी चौकशी समिती

रेल्वे अपघात प्रकरणी चौकशी समिती



औरंगाबाद (दै.लातूर प्रभात प्र.)ः जालना येथील एका लोखंडी सळई निर्मिती कारखाण्यात काम करणारे लोक कारखाना बंद पडल्याने मध्यप्रदेशातील त्यांच्या त्यांच्या गावी पायी चालत जात असताना रात्रीची वेळ झाल्याने ते रेल्वे रुळावरच विसावले, रेल्वे बंद असल्याचे माहित असल्याने ते गाफील असताना मालवाहू रेल्वेने झोपल्या ठिकाणी त्यांना चिरडून टाकले. त्यातच १६ कामगाराचा मृत्यू झाला.  त्याचे मृत देहाचे टुकडे कापडी पोत्यात किंवा पिशवीत भरुन वैद्यकीय तपासणी नंतर त्यांच्या गावाकडे रवाना होतील.  पंरतू अपघात कसा झाला, जबाबदार कोण आहे, याची चौकशी करण्यासाठी रेल्वे विभागाने चौकशी समिती नियुक्त केली असून, त्या चौकशीतूनच मृतांना न्याय मिळेल अशीच अपेक्षा सर्वत्र व्यक्त होताना दिसते आहे. 
 कोरोना कोविडच्या फैलावामुळे लॉकडाउन जारी केले गेले, उद्योग धंदे बंद पडले, कामगाराची उपासमार होवू लागली, अशातच जालना येथील कामगारांनी गाव गाठण्याचा निर्णय घेतला, टाळेबंदीमुळे परवानगी नाही, कारखानदार मालक, दाद देत नाही, अशा परिस्थितीत जगावे कसे म्हणून रेल्वे पटरी मार्गाने त्या कामगाराने मध्य प्रदेशची वाट धरली.  पंरतू रेल्वे बंद असल्याने त्यांना अंदाज आला नाही, आणि झोपल्या ठिकाणीच त्यांना मृत्यूने गाठले.  मृत्यूचे कारण हे लॉकडाउन व जालना येथील कारखानदाराने मदत नाकारली म्हणून कामगारानी गावचा रस्ता धरला त्यात मृत्यूने गाठले, शासन आणि कारखानादार हेच जबाबदार असताना चौकशी समिती कशाला अशीच चर्चा जालना, औरंगाबाद परिसरात होताना दिसते आहे.  चौकशी समिती मागील गौडबंगाल काय असावे, माजी मंत्री अर्जून खोतकर आणि रेल्वे राज्य मंत्री दानवे पाटील यांनी काय चर्चा केली याची माहिती मिळाली नसल्याने चौकशी करण्यापूर्वीच राज्य शासनाने मात्र प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहिर केली.  तर रेल्वे विभागाने ही मदत जाहिर करुन अपघात प्रकरण चौकशी समितीकडे कसे काय ठेवले अशी चर्चा होत असून कोरोना कोविड फैलावापासून अपघात प्रकरण दडपले जाते की काय अशीच शंकात्मक चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या