*लातूर जिल्हयातील ९१ पैकी ८४ निगेटीव्ह, ४ पॉझिटिव्ह तर ३ अनिर्णित*
लातूर,(जिमाका) - विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक २३ मे २०२० रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण ९१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील ४३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ४० व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून २ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व १ व्यक्तींचा अहवाल (खपलेपलर्श्रीीर्ळींश) आला आहे.
त्यापैकी *एक रुग्ण अहमदपूर तालुक्यातील पाटोदा* येथील असून त्याची प्रकृती या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गंभीर होती. रुग्णालयात दाखल होताना रक्तदाब कमी होता व त्यांना मागील दोन वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार खपींशीींळींळरश्र र्श्रीपस वळीशरीश होता व तो त्यावर उपचार घेत होता. सद्यस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. व *दुसरा रुग्ण लातूर येथील ६ वर्षाची मुलगी* असून तिला ताप व निमोनिया असून तिची प्रकृती स्थिर आहे व ती उपचाराला प्रतिसाद देत आहे.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण २० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी १९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन *एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह* आला आहे. जळकोट येथुन २ व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. *रेणापूर येथील १७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी १४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह* आला असून २ व्यक्तींचे अहवाल (खपलेपलर्श्रीीर्ळींश) आहेत. मुरुड येथील ७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ७ व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील २ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे लातुर जिल्हयातील एकुण ९१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ८४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ३ व्यक्तींचे अहवाल खपलेपलर्श्रीीर्ळींश आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली. लातूर जिल्हा कोरोना रुग्ण अपडेट दि. २३ मे २०२०, जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्ण- ८२( शिराढोन चा एक रुग्ण उस्मानाबाद ने त्यांच्याकडे दाखवलेला आहे, परंतु उपचार आपल्याकडे सुरू आहेत) उपचार घेत असलेले एकूण रुग्ण-४५. उपचाराने बरे झालेले रुग्ण- ३६, मृत्यू झालेले रुग्ण-०२.
*लातूर जिल्हयातील ९१ पैकी ८४ निगेटीव्ह, ४ पॉझिटिव्ह तर ३ अनिर्णित*
वैशिष्ट्यीकृत बातम्या
पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...
-
माझ्या प्रिय मित्रांनो, काल लातूर आणि संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांनी डॉल्बीमुक्त मिरवणुकांसाठी एक नवीन ट्रेंड स्थापित क...
-
लातूर,(जिमाका) : दि. ३१ ऑगस्ट २०२५: परिवहनेत्तर (मोटरसायकल) संवर्गातील वाहनांसाठी MH24-CC ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मा...
-
लातूर, (जिमाका) : महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा कणा मानला जातो. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक ...
-
लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...