लातूरकरानो स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्या
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड हा विषारी रोग आहे. लातूर येथील शासकीय दवाखान्यात उपचार होत आहेत. गर्दी वाढते आहे, लागण होण्यापूर्वीच सावधगीरी बाळगण्यात घरी, दारी काळजी घ्या, बाहेर फिरणे टाळाच, उपासमारी झाली तरी ही हारकत नाही पंरतू कोविड विषाणूचा परतावा करणेसाठी नागरीकांनी स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्या, दुसर्यावर किंवा वैद्यकीय अधिकार्यावर विसंबून राहू नका असे नागरीक आपसात बोलताना दिसत आहेत.
सरकारी दवाखाना चांगला असल्यामूळे गर्दीमूळे कोविडची लागण होवू शकते, लातूर महानगरपालीका दवाखाना असून नसल्यागत असल्याने आपणच आपली काळजी घ्यावी. घरातच सुरक्षीत व सावधपणे राहावे, इतरानाही सांगावे अशीच चर्चा लोक करीत असून अंतर राखूनच बोलताना दिसत आहेत.