पत्रकार एजाज कुरेशिवर जीवघेणा हल्ला करणार्‍यांचा तीव्र जाहीर निषेध

पत्रकार एजाज कुरेशिवर जीवघेणा हल्ला करणार्‍यांचा तीव्र जाहीर निषेध 



पत्रकार व कुटुंबियांना संरक्षण द्यावे भोकर तालुका पत्रकार संघाची मागणी 


       भोकर / सिद्धार्थ जाधव /  पत्रकारिता हा लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते,तसेच कोरोना महामारी संकटाच्याकाळात  सामान्य जनतेच्या हितार्थ जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणारे व प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करणारे,भोकर येथील  पत्रकार तथा भोकर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी शेख एजास कुरेशी यांना अवैध वाहतुक करणा-या दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे,सदरील घटनेचा भोकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने ’तीव्र जाहीर निषेध!’ करण्यात येतो आहे,वरील घटनेशी संबंधित त्या आरोपींना तात्काळ अटक करुन कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी,व निर्भीड पत्रकार  कुरेशी व त्यांच्या कुटूंबीयांना संरक्षण मिळावे,अशी स्थानिक पत्रकारांची मागणी आहे,अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
      सदरील विषयी भोकर तालुका मराठी  पत्रकार संघाच्या वतीने उत्तम बाबळे,संपादक(अध्यक्ष),सिद्धार्थ जाधव(सचिव),बालाजी नार्लेवाड(उपाध्यक्ष) गंगाधर पडवळे, राहुल कदम,सुधान्शु कांबळे, संदेश कांबळे,आणि सर्व पदाधिकार्‍यांनी  जाहीर निषेध व्यक्त केला असून सदरील कुरेशी कुटूंबियांना संरक्षण देण्यात यावी व आरोपी तात्काळ अटक करून  कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या