तिघाविरुध्द ऍट्रॉसिटी व पोस्को अंतर्गत भोकर पोलिसात गुन्हा दाखल
भोकर/सिद्धार्थ जाधव/ येथील शेख फरिद नगर मधील एका दलित महिलेची १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचास गेली असता तिचा पाठलाग करीत विनय भंग करून जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्या वरून तिघा विरुध्द पोस्को व ट्रॉसिटी कायद्या अंतर्गत भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त येथील शेख फरीद नगर मधील दलित महिलेची १३ वर्षीय अल्पवयीन मलगी ही दिनांक ३० मे २०२० रोजी सकाळी ९ ते रात्री ९ च्या दरम्यान शौचास गेली असता आरोपी बंटी मारवाडे हा मुलीचा पाठलाग करून सदरील अल्पवयीन पिडित मुलीचा विनयभंग केला व बंटी मारवाडे याचे सोबती आरोपी राजू मारवाडे व राजेश गुंजाळे या दोघांनी पीडित मुलीच्या घरासमोर जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली सदरील घडलेल्या घटनेबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बंटी मारवाडे, राजु मारवाडे व राजेश गुंजाळे हे तिघेही राहणार शेख फरीद नगर भोकर या तिंघाविरोधात भोकर पोलीसात सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गु.र.क्र.२५०/२०२० , कलम ३५४(५), ३२३, ५०४(३४), भा दंवि सह कलम १२ पोस्को सह क. ३ (१),(थ)(ळ)(ळळ), (ठ)(ड)अनुसूचित जाती जमाती ट्रॉसिटी कायद्या अंतर्गत आरोपी विरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (अर्धापूर) बाळासाहेब देशमुख हे करीत आहेत.