टाळेबंदी शिथील होताच उद्योग धंदे सुरु, पण ...
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.)ः देश व राज्यातील टाळेबंदी शिथील होताच अनेक उद्योग व्यवसाय सुरु झाले असून लघुमध्यम प्रकल्पाना उभारणी देण्यासाठी केंद्र सरकारने पॅकेज देले आहे. त्यातच अन्य उद्योग धंदे लवकरच सुरु करण्यात येणार असून परदेशी उद्योजकांना राज्यात उद्योग सुरु करणे बाबत धोरणात्मक बदल करणेसाठी अटी व नियम बदल करुन तशी प्रक्रिया चालू आहे. त्यासाठीचे स्पष्टीकरण करुन उद्योग मंत्री सुभाष देशाई यांनी देशभरातील उद्योजकांनी मे अखेरपर्यंत धीर धरावा सर्वकांही सुरळीत होईल असे अहवान केले आहे.
कोरोना कोविड संकटामुळे जगभरातील उद्योग व्यापार ठप्प आहे, त्यासाठी ठोस पाउले उचलून उद्योग सुरु केले जात आहेत. कामगारांची प्रश्न सुटत आहे. नविन उद्योजकाना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याच्या हालचाली सुरु असल्याने उद्योग क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे. पंरतू मागासवर्गीयांचे बंद पडलेले उद्योग कारखाने सुरु करणेसाठी व त्यांना उभारी देण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत, काय सुविधा राज्य सरकार पुरविणार आहे, या बाबतीचा तपशील मात्र उद्योग मंत्री देशाई यांनी दिला नसल्याने मागासवर्गीय उद्योजक व्यापारात अस्वस्था निर्माण झाल्याचे चित्र दिसते आहे.
आजघडीला सुरु झालेले सर्व उद्योग व्यवसाय हे एमआयडीसी परिसरातील असून राज्यातील विशेषतः नाशिक, रायगड, औरंगाबाद या विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वच उद्योजक हिरारीने शासनाला सहकार्य करुन आहे त्या मदत व सवलतीत कारखाने उद्योग व्यवसाय सुरु करीत आहेत. त्या बद्दल शासन पातळीवरुन सहकार्य होत असून इतर ठिकाणी ही उद्योग व्यवसाय चालू करणेसाठी प्रयत्न चालू असल्याचे स्पष्टीकरण एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन यांनी केले. पंरतू दैनिक लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने मागासवर्गीय उद्योजका संदर्भात काय निर्णय घेतलेत यावर सिईओ यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्याकडे उंगली निर्देश केले. यावरुन मागासगर्वीय काखानदार उद्योजकाना न्याय मिळतो की नाही, या बद्दल शंका कुशंकाना वाव मिळतो आहे. असेच बोलले जाते आहे.