टिकेची पर्वा न करता जबाबदारी व खबरदारीतूनच कोविड निर्मूलनासाठी कारवाई
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडची देशभरातील लागन त्यात महाराष्ट्रात अधिकचा फैलाव होत असताना लातूर शहर व जिल्ह्यात कोरोना कोविडची लागण होवू नये यासाठीची जबाबदारी व खबरदारीतूनच सर्वकांही करीत आहे, कोणी टिका करीत असेल किंवा नसेल पंरतू कौतूकासाठी नव्हे तर सामाजीक व मानवी जानीवेतूनच कोरोना कोविडसाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे सर्वकांही करीत असावेत अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. टाळेबंदी, फिजीकल अंतराचे पालन त्यातील दिरंगाई त्यातून होणारे परिणाम आणि त्यातून होणार्या कारवाईमूळे नागरीकात सभ्रम निर्माण होत असला तरी जिल्हाधिकारी म्हणून टिका सहन करुन ही जनतेच्या सुविधासाठी कोविडचे निर्मूलन करणे हे आद्यकर्तव्य ठरत असल्यानेच जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता ते कार्यरत असावेत असेच त्यांच्या कोविड निर्मूलन कार्यवाहीतून स्पष्ट होते.
टाळेबंदी शिथील झाली, शक्यतेनुसार ती राबवीणे किंवा ती कठोर करणे हे स्थानीक पातळीवर जिल्हाधिकारी यांना अधिकार असल्यानेच परिस्थिती ओळखून आणि आजमावून तशी अमलबजावणी करावी लागतेच, त्यात कांही समुहावर अन्याय होत असेल ही पण ती कारवाई जाणीवपूर्वक नसतेच पण तसा गैरसमज होतो, कारण जनतेच्या अडीअडचणी त्यांच्या समस्या, सुखसोयी सोबतच त्यांच्यावर आलेल्या संकटाचे रोगराईचे निर्मूलन करणे हे ही बाब संबधीत अधिकार्यांच्या तारेवरची कसरत असते. ती निभवावी लागतेच. यावर दुसरा पर्यायच नसतो. म्हणून टिकेला बाजूला ठेवून जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे न्यायीक मार्गानेच सर्वकांही करीत असावेत असेच चित्र त्यांच्या कृतितून दिसते.
उद्योग व्यापार कामगार मजूरांचे प्रश्न ज्यांचे हातावर पोट असते त्यांचेही प्रश्न असतातच, त्या संदर्भात वृत्तपत्रातून तक्रारी येतात. पण सर्वच दुकाने चालू केली तर गोंधळ होईल त्या नागरीकांची गैरसोय होईल म्हणूनच अंतराअंतराने प्रत्येकी दोन दिवसाचे परवाने देवून संमतोल साधूनच अनेक दुकानदार व्यापार्यांना व त्यांच्या व्यवहारासाठी परवानगी दिली. यात गैर कांही नसावे, यातच लातूर शहर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील परिस्थिती बघता लातूर शहरच हे स्वतंत्रपणे वावरते आहे. कमी जास्त प्रमाणात उद्योग व्यवसायासह मजूरांनाही काम मिळते आहे, याचा गाजावाजा न करता कोरोना मुक्तिसाठीच लक्ष केंद्रीत करुन जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे टिकेला अव्हेरुनच कार्यरत असावेत असे त्यांच्या कृतीतून दिसते.
सर्वच व्यापारी दुकानदाराना सारखाच न्याय द्यावा तर त्यांच्यातच मतभेद दिसत असल्याने तसा निर्णय न घेता कामगार मजूरांना ही काम मिळावे यासाठीचा विचार करुनच पूर्वपरवानगी किंवा बंधनात कोणाला ही ठेवता येत नाही, त्यासाठी नियमानुसार परवानगी आणि अटी पाळल्यातरच सर्वकांही व्यापारी उद्योजकाना वेळेच्या बंधनातूनच परवानगी दिली जाईल व ती दिलेली आहे, त्यातूनच कमी जास्त प्रमाणात कामगाराना न्याय मिळत असेल, अशी ही त्या मागची भावना असावी असे ही नागरीकात चर्चा होताना दिसते आहे.
आजघडीला केवळ जिल्हाधिकरी जी श्रीकांत हेच कोरोना कोविड मुक्तिसाठी आग्रेसर आहेत, शासकीय क्षेत्रातील सर्व अधिकार्याना सोबत घेवून काम करत आहेत., जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी तसे संबधीत अधिकार्याना आदेश नोटीस देवूनही कोणी सहभागी होत नसतील तर जिल्हाधिकारी म्हणून लोक त्याच्याकडेच बोट दाखवितील. म्हणून जिल्हाधिकारी हे प्रशासकीय अडचणी, विविध विभागातील अधिकार्यांची उदासीनता, प्रत्यक्षात काय घडते आहे हे लोकासमोर येवू देत नसतील, समजून उमजून घेवून जिल्हाधिकारी हे स्वतःच कोरोना कोविडच्या मुक्ति लढाईत कार्यरत असावेत, अशीच चर्चा होताना दिसत असून टाळेबंदी व फिजीकल आंतराच्या कारवाईमुळे अनेक गोरगरीब जनता आर्थिक आडचणीतून सोने विक्री करण्यासाठी जात असतील तर सराफा बाजारात त्यांची लुटमार होते, त्यासाठी सराफा बाजार पुर्णतः बंद असून गरजेनुसार अन्नधान्य खरेदी साठी बाजार मोकळा ठेवून त्यांतून आम नगारीकांची सोय होते आहे. याकडे जिल्हधिकारी यंाचे लक्ष असावे त्यातच मोफत अन्न धान्य वाटपातही त्यांनी लक्ष देवून असल्यामूळे आजघडीला सर्वकांही न्यायीक होत असले तरी विविध भागातून जिल्हाधिकारी यांच्यावर स्वार्थी भावनेतून टिका होते आहे, अनेक लोक प्रतिनिधी नाराज आहेत. तसे असले तरी ही जिल्हाधिकारी जी श्रीकात हे टिकेची पर्वा न करता जबाबदारी व खबरदारीतूनच कोरोना कोविड निर्मूलनासाठी कारवाई करीत असल्याचीच चर्चा सर्वसामान्य जनतेतून होताना दिसते आहे.