लातूर जिल्ह्यातील अवैद्य वाळू उपास कधी थांबणार

लातूर जिल्ह्यातील अवैद्य वाळू उपास कधी थांबणार



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर जिल्ह्यातील देवणी तालूक्यातील मांजरा नदीवरील जवळगा हिसामनगर, चाकुर तालुक्यातील घरणी नदी, व औसा तालुक्यातील अलमला येथे ही राजरोषपणे अवैद्य वाळू उपासा होत  आहे.  विनापरवाना गौणखणीजे वाळू उपसा होत असून शासकीय महसूल वाळू तस्कराकडून बुडविला जातो आहे, जवळगा परिसरातील नागरीकांनी तक्रारी केल्या, दैनिक लातूर प्रभातने वृत्तांकन केले, जिल्हास्तरासह उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी चौकशी केली पण अवैद्य वाळू उपसा चालूच असल्याच्या तक्रारी असून लातूर जिल्ह्यातील अवैद्य वाळू उपसा कधी थांबणार अशीच त्या परिसरातील नागरीकांतून चर्चा होताना दिसते आहे. 


औसा तालुक्यातील अलमला येथे अवैद्य वाळूसाठा तस्करी होत असून तशी तक्रार ही करण्यात आली.  तेथील तक्रारीवरुन तलाठी सोनवते यांनी पाहणी करुन अवैद्य वाळूसाठा जप्त करुन तसे आढळून आल्याचा अहवाल सादर केला.  पंरतू संबधीतावर काय करवाई केली हे मात्र दैनिक लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता तसे कळाले नाही, असे प्रकार नेहमीच देवणी, चाकूर, रेणापूर, औसा परिसरात अधून मधून होत असतात.  चौकशी होते, पण तस्करी थांबत नाही, वाळू उपसा होतच असतो.  वाळू उपसा करणार्‍या व्यक्ती किंवा तस्करावर कोणतीच कारवाई कशी काय होत नाही, पाबंदी केली जात नाही यातील गौडबंगाल काय असावे अशीच उलटसूलट चर्चा होत असून जिल्ह्यातील गौण खणीज वाळू उपसा कोण रोखणार अशीच चर्चात्मक मागणी होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या