सोने कर्जरुपाने कशाला, सरकाने अधिग्रहनच करावे
सातारा (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडच्या महामारी विषाणु संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखीळ झाली, ती सुधारणे कठीण झाले असून त्यासाठी उद्योग व्यवसायाला उभारणी देणे, आर्थिक मदतीबरोबरच कर्जा पोटी अर्थ सहाय्य गठीत करुन देशाची आर्थिक घडी बसविणे, गरजेचे असल्याने भारतातील सर्व देवस्थान ट्रस्टीकडून मंदीरातील सोने कर्जरुपी घ्यावेत व त्या तारणातून भारताची अर्थिक घडी बळकट करावी अशी मागणी तत्कालीन पंतप्रधान कार्यालयातील माजी केंद्रिय राज्य मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली असून, त्यांच्या न्यायीक व धाडसाचे सर्वत्र कौतूक होताना दिसते आहे.
वास्तवीक पाहता देव धर्म हे आत्मीक समाधानासाठी असतात. त्यातून नागरी समस्या किंवा सकंटाचे निर्मूलन होत नसते. पंरतू अशा या देवस्थानात देणगीच्या रुपाने अधिकृतरित्या क्विंटलवर सोने पडून आहे. नगदी रोख रक्कम अचल संपती ही भरपूर असून अनाधिकृतरित्या किती व कोणाकडे असावी याची गणती नसावी. पंरतू श्रधाळू व्यक्तिच्या भावना न दुखविता जे काही आहे ते शिल्लक ठेवून देशभरातील तमाम देवस्थानातील सोने कर्जरुपी नव्हे, तर अधिग्रहन संपादीत करुन सरकारने देशाची आर्थिक घडी बसवावी त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही, किंवा कोणावर अन्याय होवू शकत नाही. यासाठी सोने सरकारने हस्तगत करुन देशाचे अर्थकारण बळकट करावे अशीच मागणी सर्वस्तरातील लोकातून व्यक्त होताना दिसते आहे.