संपादकीय...
आत्मनिर्भर व्हायचय...
आत्मनिर्भर भारतासाठी एक नवा संदेश नविन संकल्पना मांडून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना देशभरातील उद्योजकाना उत्तेजीत केले. आणि केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या मुखहस्ते उद्योेगाचे तीन टप्पे पाडून सुक्ष्म उद्योग, लघु उद्योग, आणि मध्यम उद्योग या प्रकारातून देशाची अर्थव्यवस्था सुधारणेसाठी महायज्ञ प्रकल्पी योजना जाहिर केल्याने काय होणार, काय घडणार आहे, हे एका कोरोना कोविडच्या विषाणूत्मक ज्वालामुखिला प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी एका मेणबत्तीने घायाळ केले. आणि या विषारी कोविड जंतूने, सख्यारे घायाळ मी हरीन, म्हणून भारतीयांच्या माणगुटीवर बसले. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळे करुन सोडले. त्यावर उपाय म्हणून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी एक पॅकेज दिले. आणि याच पॅकेज मधून उद्योगातील उत्थानातूनच आमजनतेला उध्वस्त करण्याची पेरणी केली की काय अशीच शंका येताना दिसते आहे. ती नाकारुन चालणार नाही, अशीच चर्चा जाणाकारातून व्यक्त होताना दिसते आहे.
कोरोना कोविड बाधीत रुग्णाची जशी तीन रंगात विभागणी करण्यात आली, तशीच विभागाणी उद्योग धंद्यात केली असून पाच-दहा कोटी पासून शंभर कोटी पर्यंतचे पॅकेज कर्जभांडवली रुपात उद्योजकाना या योजनेतून लाभ होणार असून निव्वळ किरकोळ किंवा तांत्रिक जोडारी किंवा स्वयं निर्मित उद्योजकाना त्यात थारा नाही, हे सारे जे बरे आहेत, त्यांच्यासाठीच असावेत अशी चर्चा होत आहे. अशासाठीच उभारी देण्यासाठी निव्वळ परवाने देवून त्यांना कार्यरत केले जाते. पण पडलेल्या उद्योजकाना उभारी देण्यासाठी कांहीच पॅकेज नसावे ही बाब चिंताजनक असून ज्याच्याकडे कांही तरी आहे, त्यांच्यासाठीच सुविधा विनातारण कर्ज, अल्पव्याजदरात मागणीनुसार कर्जपुरवठा अशा योजना या पॅकेज मध्ये असून कोठ्यावधीची गुतंवणूक असलेल्यांना मागील सुट व पुढील कर्ज यामार्गाने त्यांना आर्थिक उर्जा मिळणार असल्याने तेच ते उद्योजक आत्मनिर्भर बनणार आहेत, यात संदेह नसावा अशीच चर्चा होताना दिसते आहे.
अन्न निर्मिती, घर बांधकाम, मंदीर, कारखाने, बंगले, काही असोत त्याची निर्मिती श्रमिकापासून कष्टकरी जनतेतूनच होत असते. तंत्रज्ञान, लोहवस्तू, इधंन, औषधी, अण्वस्त्र, जे कांही असेल ते सर्वकांही कामगार कष्ठकरीच निर्मिती करीत असतात. पाणी ही खोदकाम करुनच मिळवावे लागते. तेही कामगारच करतात. पर्यावरणातील वृक्षलागवड असेल, की वृक्ष जोपासणा असेल तीही मजुराकरवीच होत असते. मग या कामगार कष्ठकरी मजूर श्रमिकासांठी काय आहे, त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी कांही आहे काय, ज्या उद्योग व्यवसाय क्षेत्रात ते काम करतात त्यात श्रमिकांचा काय वाटा आहे, शेत जमीनी, बांधकामावरील मजूरासाठी काय आहे, इलेक्ट्रानिक, कॉम्पुटर, प्रिंटीग क्षेत्रातील कामगारासाठी काय आहे, सरकार चालविणारे ही अशा कुठल्यातरी क्षेत्रीय परिवारातूनच असतील तर त्याना हे कसे काय कळत नसावे अशीच चर्चा होताना दिसते आहे. पंरतू यात कांही तरी वेगळचे दडलेले असावे अशी शंका व्यक्त होते आहे. जे निर्भर आहेत त्यातच पुन्हा आत्मनिर्भर करायचे म्हणजे जे श्रीमंत आहेत, त्यानाच गर्भ श्रीमंत करायचे आणि गरीबांना अतिगरीब करुन त्यांनाच रस्त्यावर आणायचे हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत बनविण्याची संकल्पा असावी त्यातूनच भारत हा महासत्ताक भारत होईल आणि उद्याचालून अमेरिकेपुढे पायघड्या न घालता त्यांच्या बरोबरीने बसून जगाचे हासू की रडू पाहयाचे, हेच स्वप्न भावना असावी की काय असेच बोलले जाते आहे.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे वरच्या वर्गाचे पाहत असावेत, आणि ते पाहणेही त्यांच्यासाठी गैर नाही, पंरतू वर्चानी खालचे मजबूत आहेत की नाही, हेही पाहणे गरजेचे असते. खालचे ढासळले तर वरचे कसे काय राहतील याचा विचार करणे गरजेचे व महत्वाचे ठरते. एक मच्छर माणसाला नाचवितो, तसाच प्रकार एका कोविड विषाणूने सार्या जगाला नाचविणे सुरु करुन वेठीस धरले आहे. त्याच प्रमाणे या देशातील कष्टकरी कामगार मजूरांनी श्रमीकांनी काम बंद करुन आंदोलने केली तर वरच्या वर्गातील लोकांची धुनीभांडी स्वयपाक, स्वच्छता, सुख दुःख कोणी पाहायाला मिळणार नाही, किंवा पाणी भरणारे किंवा पाणी देणारे शिल्लक नसणार नाहीत. मग त्यात कामगारासाठी काय योजना असाव्यात याचे भान वरच्या वर्गाना किंवा सरकारला असू नये याचे आश्चर्य वाटते. कदाचीत यंत्र युग आले म्हणून खालच्या वर्गाकडे दुर्लक्ष होत असेल पण यंत्राची बटने दाबणारी ही कामगार मजूरच आहेत, हे विसरता कामा नये, हे केंद्र व राज्य सरकारने लक्षात घेणे गरजेचे वाटते अशीच कष्टकर्यांची भावना व्यक्त होताना दिसते आहे.
आत्मनिर्भयतेने लोकप्रतिनिधी उद्योजक व्यापारी, कारखानदार जगतील पण संकटकाळी आपतकालीन प्रसंगी आलेल्या समस्या संकटाना तोंड देण्याची त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती क्षमता त्यांच्यात नसल्यामुळे खालच्या वर्गातच ती असते. हे वास्तव नाकारुन चालत नाही, म्हणून स्वतःलाच आत्मनिरिक्षण करुन वरच्यानी विचार केला तर आत्मनिर्भरता कशी असावी याचा अंदाज येतो, हे सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या उद्योगपती म्हणून मिरवणारे किंवा व्यापार कारखानदारी सांभाळणार्यांना कसे कळणार हे वास्तव नाकारता येत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे कोणीच नाकारु शकत नाही. उच्चवर्गीयासाठी आत्मनिर्भरता ही संकल्पना कोरोना कोविडमुळे आर्थव्यवस्था ढासाळली ती बळकट व्हावी यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी केली असावी, पंरतू त्याची झळ गोरगरीब कामगार मजूर कष्टकरी जनतेलाच भोगावी लागते, ती भोगत असावेत आहेत, ते निर्भय आहेत, त्यासाठी आत्मनिर्भर असणार्यानी आत्मनिर्भय असलेल्यांना कमी समजू नये कारण हा वर्ग जाणीवेतून जगत असतो. आत्मनिर्भयतेतून आत्मनिर्भर व्हायचे असेल तर टाळेबंदीत अटकलेले लोक किंवा गाव जवळ करणेसाठी पायपीट करणारे लोक वीस लाख कोटी कि.मी. चालले तर त्यांना निश्चितच आत्मनिर्भरता येईल अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. त्यासाठी ज्यांच्याजवळ आत्मनिर्भयता आहे, तेच लोक आत्मनिर्भयतेसाठी अशी तशी कोरोना मुक्ति लढाई प्रमाणेच अस्तीत्व आणि स्वाभिमानासाठीच लढत आहेत. यातच खालच्या गर्वातील लोकांची निर्भयता व निर्भरता सामावलेली असते. आणि ती साध्य होत असते. यात संदेह नसावा अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते.