भोकर तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित रक्तदान शिबीर संपन्न
भोकर/(सिद्धार्थ जाधव) : देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून बाधीतांची संख्या ही झपाटयाने वाढत आहे. त्यासाठी शासकिय रुग्णालयातील रक्तपेढीत मुबलक रक्त साठा उपलब्ध असणे अत्यंत महत्वाचे रक्त तुटवडा होत आहे.त्याच अनुशंगाने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने भोकर येथे दि.१४ मे रोजी रक्तदान शीबाराचे आयोजन करण्यात आले होते व बहुसंख्येने दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरास दात्यांकडून उदंड असा प्रतिसाद मिळाला असून सामाजिक जाणीवेतून देशहितार्थ न्यायाधीश,पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी व विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांसह १०१ दात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले असून या सर्वांसह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आणि सहकार्य केलेल्या मान्यवरांचे भोकर तालुका मराठी पत्रकार संघ्याच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.
देशभरासह राज्यातील अनेक जिल्हयात कोरोना आजाराने थैमान घातले असून सध्या नांदेड जिल्हयात देखील कोरोनासह, थॅलेसेमीया,गरोदर माता,वार्धक्य आजारी रुग्ण यांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे या रुग्णांना रक्त पुरवठ्याची मोठी गरज पडत आहे.याच सोबत विविध आजारही हातपाय पसरत असून तशा आदी आजार रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे . तब्बल सव्वा महिना ग्रीन झोन मध्ये असलेल्या नांदेड जिल्ह्यात गेल्या कांही दिवसांत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर रक्ताची अत्यंत निकड असल्याने स्व. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय संचलित रक्तपेढी, विष्णूपुरी नांदेडच्या वतीने रक्तदानाचे आवाहन करण्यात आले होते.तसेच या रक्तपेढीकडून संपर्क ही साधण्यात आला होता.या आवाहनास प्रतिसाद देऊन भोकर तालुका मराठी पत्रकार संघ,भोकर च्या वतीने दि.१४ मे २०२० रोजी सकाळी ९:०० वाजता भोकर तहसिल कार्यालयाचा तळमजला येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील शिबीराचे उद्घाटन भोकर तालूका विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधिश मा.मुजीब एस.शेख यांच्या हस्ते झाले व यावेळी प्रमूख अतिथी म्हणून वरीष्ठ स्तरीय दिवाणी न्यायाधीश मंदार पी.पांडे,दिवाणी न्यायाधीश बी.ए.तळेकर, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पवन चांडक,तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी भरत सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक विकास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहूल वाघमारे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे,पो.उप.नि. अनिल कांबळे यांसह आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.
रक्तदान हे जीवनदान असल्याने या संकटकाळात सामाजिक व देशसेवाकार्य लक्षात घेऊन रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. यावेळी भोकर न्यायालयाचे वरीष्ठ स्तरीय दिवाणी न्यायाधीश मंदार पी.पांडे व त्यांचे न्यायालयीन कर्मचारी अजय नेहूलकर, विनायक गाजरे,विजय मंडले, ऋषिकेश दमकोंडवार आणि आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केले आहे ते तरुण वकील ऍड. शेखर सतिश कुंटे,पोलीस विभागाचे अधिकारी पो.उप.नि. अनिल कांबळे व पोलीस कर्मचारी पो.कॉ.रवि मुधोळे,पो. ना.ढोले,भोकर तहसिलचे नायब तहसिलदार सुनिल पांडे व कर्मचारी गंगाधर चव्हाण,भोकर नगर परिषद अग्णीशमन विभागाचे प्रमोद बसवंते,कपिल कांबळे,बालाजी कल्याणकर व सचिन श्रिरामवार, तर भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव सिद्धार्थ जाधव यांचे कोरोना संकट कार्यकाळात अन्न धान्यदानान कार्यात मोलाचे योगदान राहिले आहे,यावेळी रक्तदानातून जीवनदान देण्याच्या सेवाकार्यात ही त्यांनी रक्तदानाने सहभाग नोंदविला.तसेच अध्यक्षांच्या वतीने चंद्रकांत बाबळे व श्रीकांत बाबळे या दोघांनी रक्तदान केले.विशेष बाब म्हणजे पवित्र रमजान महिन्यातील रोजे असतांनाही सामाजिक कार्यकर्ते मनसूर खान पठाण कोळगावकर व त्यांचे सहकारी मित्र अशा ६ मुस्लीम बांधवांनी रक्तदान केले.याच बरोबर विविध शासकीय कार्यालय,बँक,आदींचे अधिकारी, कर्मचारी व तरुणांचे मित्रमंडळ, ग्रामीण भागातील नागरीक अशा एकूण १०१ दात्यांनी रक्तदान करुन देशसेवाकार्यात सहभाग नोंदविला.रक्तदान समयी आयोजकांच्या वतीने डेलळरश्र ऊळीींरपलळपस चे नियम पाळण्यात आले व तेथील रक्तदात्यांसह सर्व उपस्थितांची कोरोना टेंम्प्रेचर यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली.मगच दात्यांकडून रक्त संकलीत करण्यात आले.दात्यांच्या सर्व सुरक्षीततेची काळजी घेऊन स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय मबाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत शासकीय रक्तपेढी,विष्णूपुरी नांदेडच्या चमूने रक्त संकलन केले.या चमूत डॉ.वितेश इंगोले,बालाप्रसाद भालेराव,रमेश राठोड,उमा गरड, अतुल टाकसंदे,बाबूराव गायकवाड व हाडे यांचा समावेश होता.
कोरोना महामारीच्या संकटावर विजय मिळविण्यासाठी रक्तदान करण्यासाठी दात्यांनी बहुसंख्येने पुढे यावे,असे अवाहन उपरोक्त मान्यवरांसह भोकर तालूका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते.यास दात्यांनी उत्स्फुर्तपणे उदंड प्रतिसाद दिला व काही दिवसांपुर्वीच भोकर येथे रक्तदान झालेले असतांनाही मोठ्या संख्येने रक्तदान केले. यामुळे त्या दात्यांसह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेऊन सहकार्य केले.त्या सर्व सन्माननियांचे ऋण व्यक्त करण्यात आले असून या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे, सचिव सिद्धार्थ जाधव,गंगाधर पडवळे,संदेश कांबळे,राहूल कदम,बालाजी नार्लेवाड,स्वरुपा भोसले (चौरे), विलास हटकर अतुल चौरे यांसह आदींनी परिश्रम घेतले.