अतिक्रमणे हटली, बाजारपेठ फुलली, फेरिवाल्याचे काय

अतिक्रमणे हटली, बाजारपेठ फुलली, फेरिवाल्याचे काय


      लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूरची गंजगोलाई ही मुख्य बाजारपेठ आहे.  या परिसरात अतिक्रमने नको आहेत, पण गंजगोलाईच्या बाहेरील परिघात जे अतिक्रमीत लोक होते, त्यांना कायमस्वरुपी जागा दिली गेली नाही.  ते वार्‍यावरच आहेत, पण जे लोक गाड्यावर येवून पोटाची खळगी भरण्यासाठी सांयकाळच्यावेळी गोलाईत येवून कांही तरी विकून पोटभरतात अशाना हटवून व्यापारी उद्योग व्यवसाय करणार्‍याचे हित साधून जिल्हा प्रशासन किंवा मनपा प्रशासनाला काय साध्य होणार आहे, अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 



कोरोना कोविड मुळे लॉकडाउन झाले, त्यात चिंता आल्याने जे हातगाडेवाले, फेरीवाले, रस्त्यावर येवून दहा, पाच रुपये कमवावेत यासाठी गोलाईत आले.  पण त्यांना अतिक्रमनाच्या नावाखाली हटवून पार्कींगची व्यवस्था करणे कायम स्वरुपी व्यापारी दुकानदांराची सोय करणे, आणि अतिक्रमीत असलेल्या लाभधारक छोट्या व्यवसायीकांना वार्‍यावर सोडणार्‍या या मनपा जिल्हा प्रशासनाच्या कृतीला सर्वसमावेशक न्याय किंवा विकासात्मक सोयीसुविधा म्हणता येणार नाही, ती केवळ हातगाडीवाले आणि फेरीवाल्यावर होणारी अन्यायकारक कृति असावी अशीच चर्चा होत असून पंरतू न्यायीक व्यवहारात्मक विचार केला तर बाजार सुरळीत व्हावा, पार्कीगंची व्यवस्था व्हावी, त्याच बरोबर रोजी पोट भरुण खाणारे जिव ही यात गंजगोलाईत काम धंदा करुन कुटूंबांची उपजिविका भागवितात, यांच्याकडे ही जिल्हा प्रशासन मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत असून अतिक्रमणे हटली, बाजार पेठ फुलली, पण हातगाडीवाले फेरीवाल्यांचे काय हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो.  त्यांचे काय अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये*मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार आहे

              मुंबई (जिमाका) : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सा...

लोकप्रिय बातम्या