लातूर जिल्हा कोरोना विषाणू अपडेट
लातूर,(जि.मा.का) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक २१.०५.२०२० रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण ९५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील २९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते व त्यातील २७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटीव्ह अहवाल आलेला व्यक्ती ६५ वर्षाचा असुन तो नाकाच्या ऑपरेशनसाठी या रुग्णालयात दाखल झाला होता. ऑपरेशन करण्यापूर्वी त्या व्यक्तीला होल्डींग वार्ड मध्ये ठेवून त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याची प्रकृती स्थित आहे. तो मागील ८ दिवसापूर्वी बिदर येथुन आला असुन सदर व्यक्ती लेबर कॉलनी येथील आहे. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण ३६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी ३५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. चाकुर येथुन ०२ व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील ०६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असुन त्यापैकी ४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आले आहेत. मुरुड येथील ०७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अहमदपुर येथील ०९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
स्त्री रुग्णालय, लातुर येथील ६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, असे लातुर जिल्हयातील असे एकुण ९५ स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ८७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व ६ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
(लातूर जिल्हा कोरोना विषाणू अपडेट, दिनांक २२ मे २०२० जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्ण- ७३, उपचार घेत असलेले रुग्ण- ३५, उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण- ३६, मृत्यू झालेले रुग्ण-२)