शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही, पण शेती पिकविणार्याचे काय
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः भारत हा कृषि प्रधाण देश आहे. कोरोना नंतर जग बदलणार आहे, त्यात कृषि क्षेत्रातील अतिशय महत्वाची भुमिका असणार आहे. अन्न धान्याचे उत्पादन दर्जेदार पिक घेणे, हे लक्षात घेवून पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे पाठपूरावा करीत आहोत,शेतकर्याना वार्यावर सोडणार नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यस्तरीय खरीब हंगाम पुर्व बैठकीत बोलताना व्यक्त केले. हे विधान दुरदर्शन वरुनर ऐकताच शेतकर्याना वार्यावर सोडणार नाही पण शेती पिकविणार्याचे काय असा सवाल शेतीतील सालगडी व शेतमजूरांनी उपस्थित केल्यामूळे राजकीय व कृषि क्षेत्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते आहे.
कोरोना कोविडची बाधा झाल्यामूळे ज्वारीची रास अडगळीत पडली, फळे भाजीपाला नासाडीत गेला, बि बियानाचा प्रश्न निर्माण झाला, खताचा प्रश्न आहेच, पण या सर्व सुविधा शेतकर्याना पुरविल्या जाणारच असल्याने शेतकर्यानी विचलीत होवू नये, शेतकर्यांना वार्यावर न सोडता न्याय देवू असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात, पण ज्या शेतीतील पिक भाजीपाला फळे हे सालगडी मजूरच त्यांच्या कष्टातून पिकवीतात त्यांना मोलमजूरीचा योग्य तो परतावा मिळत नाही, अशा काळात शेतकर्यासह शेतीतील सालगाडी शेतमजूरांसाठी काय सुविधा अर्थसहाय्य आहे, ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगू शकले नाहीत, असाच प्रश्नच शेत मजूर कष्टकर्याना भेडसावीत असल्याने सर्वत्र बोलले जाते आहे. शेतकर्याना वार्यावर सोडणार नाही, पण शेती पिकविणार्याचे काय याचे समर्पक उत्तर कोण देणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो, अशी चर्चा होताना दिसते आहे.