कोविडने लातूर सोडले, ग्रामीण धरले
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड १९ या विषारी विषाणू रोगाला गरीब श्रीमंत जात पंथ किंवा शहरी ग्रामीण असा भेदभाव नसतो. पण लातूर शहरात जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा शिरकाव करु देत नाहीत म्हणून कोविड संसर्ग रोगाने उदगीर निलंगा तालुक्यातील ग्रामीण भाग निवडला असावा म्हणूनच कोविड संसर्गीत रोगाने लातूर सोडले आणि ग्रामीण क्षेत्र स्विकारले अशीच चर्चा सर्वसामान्य जनतेत होताना दिसते आहे.
लातूरला बस्तान बसवावे तर जिल्हाधिकारी जी श्रीकांत, वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी मनपा प्रशासनासह पालक मंत्री अमित देशमूख, राज्य मंत्री संजय बनसोडे ठाणमांडून बसले असल्याने गांव बरा बाका म्हणून कोरोना कोविडने ग्रामीण भागाकडे कुच केली असतानाच मध्यतंरी माळे गल्लीतील एक रुग्ण, आणि कालचा लेबरकॉलनीतील एक रुग्ण यामुळे लातूरला गालबोट लागले असले तरी टाळेबंदीत ही लातूरकरांनी शासकीय नियम पाळले, यातूनच टाळेबंदीला शिथीलता मिळाली. ती नागरीकांच्या संयमामुळेच असल्याने लातूरात कोविड स्थिरावला. ग्रामीण विभागात पसरला असला तरी जिल्हा प्रशासन पेालीस यंत्रणा व लोकप्रतिनिधीने विशेषतः पत्रकारानी गाफील राहू नये अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होताना दिसते आहे. कोविडने लातूर सोडले, ग्रामीण धरले, ही भावना लोकात रुजत असली तरी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष न करता कोविड विरोधातील लढाई यशस्वी करावी जनता सोबतीला आहे, असेच लोकामध्ये बोलले जाते आहे.